'हे' आहे माधुरी दीक्षितच्या सुंदर केसांचं गुपित! अभिनेत्रीने स्वतःच दिली माहिती..
Last Updated:
Diy Hair Mask : बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या सुंदर केसांचं गुपित आपल्याला सांगितलं आहे. तिने एक घरगुती आणि उत्तम हेअर मास्क वापरण्याचा सल्ला दिलाय. चला तर मग, माधुरी दीक्षितचा हा हेल्दी हेअर मास्क कसा बनवायचा आणि त्याचे फायदे काय आहेत.
मुंबई : सुंदर, घनदाट आणि काळेभोर केस सर्वांनाच हवे असतात. मुलगा असो की मुलगी कोणीही त्याला अपवाद नाही. सर्वजण आपल्या केसांची यथोचित काळजीही घेतात. मात्र तरीही काही लोकांना केसगळतीचा, केस तुटण्याचा किंवा केस न वाढण्याचा त्रास असतो. यासाठी लोक अनेक प्रकारचे उपायही करतात. पण सर्वांनाच त्याचा फायदा होईल असेही नाही. बऱ्याचदा लोकांच्या समस्या वाढतातही.
काही लोक बाजारातून महागडे आणि नामांकित ब्रँडचे शॅम्पू विकत वापरतात, पण त्याचा फारसा फायदा होत नाही. उलट, केस अधिकच रुक्ष वाटू लागतात. पण आता काळजी करायचं कारण नाही. कारण बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या सुंदर केसांचं गुपित आपल्याला सांगितलं आहे. तिने एक घरगुती आणि उत्तम केळीपासून बनवलेला हेअर मास्क वापरण्याचा सल्ला दिलाय. चला तर मग, माधुरी दीक्षितचा हा हेल्दी हेअर मास्क कसा बनवायचा आणि त्याचे फायदे काय आहेत, ते सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
केळीचा हेयर मास्क तयार करण्यासाठी लागणारे साहित्य..
1 पिकलेली केळी
2 चमचे दही
1 चमचा मध
केसांवर असा लावा हेयर मास्क..
एका वाटीत केळी नीट मॅश करून पेस्ट बनवा. तुम्ही इच्छित असल्यास मिक्सरमध्येही पेस्ट बनवू शकता. आता त्यात दही आणि मध घालून चांगलं मिसळा. हे मिश्रण केसांमध्ये 30 ते 40 मिनिटं लावून ठेवा आणि नंतर सौम्य हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुवा.
advertisement
केळीच्या हेयर मास्कचे फायदे..
माधुरी दीक्षितने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, त्या ज्या प्रोफेशनमध्ये आहेत, तिथे केसांवर वेगवेगळ्या हेअर प्रॉडक्ट्स, कलरिंग, हीटिंग, ड्रायर, स्टायलिंग यांचा सतत वापर करावा लागतो. यामुळे केसांचं नुकसान होतं. केस कोरडे, निर्जीव होतात. चमक आणि मऊपणा कमी होतो. केळी, मध आणि दही यापासून तयार केलेला हा हेयर मास्क त्यांच्या केसांना चमक देतो, मऊ बनवतो आणि केस व टाळू निरोगी ठेवतो.
advertisement
तुम्हीही माधुरी दीक्षित यांचा हा नैसर्गिक हेयर मास्क काही दिवस लावून पाहा. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. तुमचेही केस माधुरीप्रमाणे सिल्की, हेल्दी आणि शायनी दिसतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 23, 2025 2:58 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
'हे' आहे माधुरी दीक्षितच्या सुंदर केसांचं गुपित! अभिनेत्रीने स्वतःच दिली माहिती..


