महेश भटसोबत लग्न, आलियाच्या आईला आली पश्चतापाची वेळ; म्हणाली, 'मला काम मिळणे...'

Last Updated:

Mahesh Bhatt : अभिनेत्री सोनी राजदानने सांगितले की, महेश भट सोबत लग्न केल्यानंतर मला कामं मिळणं बंद झाले. तिच्या सिनेमातील अदाकारीमुळे ती खूप प्रसिद्ध होती.

News18
News18
80 आणि 90 च्या दशकातील अभिनेत्रींना अनेक संकटांचा सामना करावा लागायचा. त्याच काळात अभिनेत्री सोनी राजदान ही एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिच्या करियरमध्येही असे लहाण मोठे क्षण आले होते जे तिने आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. तिने जेव्हा आयुष्याचा एक नवा प्रवास सुरु केला होता, तेव्हाच तिला खूप संकटांना सामोरे जावे लागले होते. तिचा त्याकाळी एक दबदबा होता. तिच्या वेगवेगळ्या अदाकारीसाठी ती खूप फेमस होती. तिने तिचा अवघड काळ मनमोकळेपणाने सांगितला आहे.
80 ते 90 च्या नायिका या लग्न करायला घाबरायच्या. कारण त्यांचे लग्न झाले की अभिनयाला ब्रेक लागायचा. सिनेमा मिळायचे बंद व्हायचे. मिळाले तरी लीड भूमिका असणाऱ्या मिळायच्या नाहीत. अगदी असेच सोनी राजदान हिच्यासोबत झाले. तिने महेश भट यांच्या सोबत लग्न केले आणि तिला काम मिळणे बंद झाले.
advertisement
लग्न झाल्यावर काम मिळणं बंद झालं
न्युज 18 सोबत बोलताना सोनी राजदान हिने आत्ताच्या इंडस्ट्रीची आणि तेव्हाच्या काळातील इंडस्ट्रीची तुलना केली आहे. त्यात तिने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे. ती म्हणाली, "मी इंडस्ट्री मध्येच लहाणाची मोठी झाली आहे, म्हणजे असे की, मी खूप वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. इतक्या वर्षात खूप मोठे बदल झाले आहेत. मला वाटते ही पूर्ण वेगळी दुनिया आहे. मी जेव्हा सुरुवात केली होती, तेव्हा मी खूप चांगले काम करत होती, पण अचानक माझे लग्न झाले. त्यानंतर मला काही काम मिळाले नाही."
advertisement
लोकांच्या बोलण्याने कंटाळली होती
लग्नानंतर सोनी राजदानला काम मिळत नव्हते. पण त्याच कठीण काळात एक रमेश सिप्पी आणि ज्योति सरप यांची टीवी सिरीयल मिळाली. त्यापासून तिचे करियर पुन्हा एकदा रुळावर आले. ती म्हणाली, मला कळले की कोणीतरी म्हटले की, ती महेश ची पत्नी आहे मग तिला कामाची काय गरज ? मला तेव्हा खूप राग आला होता. त्यानंतर मला नशिबाने काही चांगले सिनेमे मिळाले. पण त्याअगोदर खूप मानसिक तणाव होता. आजच्या काळात हे सगळे बदलले आहे. आजच्या अभिनेत्री या वैयक्तिक जीवनालाही सहज जगू शकतात.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
महेश भटसोबत लग्न, आलियाच्या आईला आली पश्चतापाची वेळ; म्हणाली, 'मला काम मिळणे...'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement