थंडीच्या दिवसांत खा गरमागरम दूध-चीज मॅगी; चव अशी की एकदा खाल्लात तर विसरू शकणार नाहीत
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तिचा क्रीमी टेक्स्चर, चीजचा रिच फ्लेवर आणि मॅगीचा देशी मसाला या सगळ्याचं एकत्रण इतकं स्वादिष्ट आहे की एकदा खाल्ल्यावर परत परत बनवावंसं वाटतं.
मुंबई : जर तुम्हीही मॅगीप्रेमी असाल, तर ही नवी रेसिपी तुमचं मन नक्कीच जिंकेल! मॅगी आपण मसालेदार, व्हेज किंवा तडका लावून अनेक वेळा खातो, पण कधी ‘दूधवाली मॅगी’ ट्राय केली आहे का? होय, दूध आणि चीजपासून तयार होणारी ही क्रीमी मॅगी म्हणजे अगदी परफेक्ट कम्फर्ट फूड. तिचा क्रीमी टेक्स्चर, चीजचा रिच फ्लेवर आणि मॅगीचा देशी मसाला या सगळ्याचं एकत्रण इतकं स्वादिष्ट आहे की एकदा खाल्ल्यावर परत परत बनवावंसं वाटतं.
थंडीच्या दिवसांत ही गरमागरम दूधवाली चीज मॅगी खाण्याचा आनंद वेगळाच असतो. ऑफिस लंच, इव्हनिंग स्नॅक किंवा वीकेंड ट्रीट कुठल्याही वेळेस ही झटपट तयार होणारी रेसिपी परफेक्ट पर्याय ठरते. चला तर मग जाणून घेऊ या दूधवाली चीज मॅगी बनवायची सोपी पद्धत.
दूधवाली चीज मॅगी रेसिपी आणि त्यासाठी लागणारं साहित्य काय आहेत? चला जाणून घेऊ.
advertisement
आवश्यक साहित्य :
मॅगी नूडल्स – 2 पॅक
दूध – 200 ml
कांदा – अर्धा (बारीक चिरलेला)
हिरवी मिरची – 2 (बारीक चिरलेल्या)
बटर – 1 मोठा चमचा (20 ग्रॅम)
चीज – 20 ग्रॅम (किसलेले)
पेरी पेरी पावडर – 2 टीस्पून
लसूण पावडर – 2 टीस्पून
कांदा पावडर – 2 टीस्पून
advertisement
मीठ – चवीनुसार
पाणी – आवश्यकतेनुसार
कृती (Step-by-Step Method) :
स्टेप 1: बेस तयार करा
एका पॅनमध्ये थोडं पाणी आणि दूध घाला. हे मिश्रण मध्यम आचेवर गरम करा. लक्षात ठेवा, दूध जास्त उकळू नये नाहीतर ते फाटू शकतं.
स्टेप 2: कांदा-मिरची सॉते करा
दुसऱ्या पॅनमध्ये बटर गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून हलक्या सोनेरी रंग येईपर्यंत परता. यामुळे मॅगीला एक मस्त सुगंध आणि हलकी गोडसर चव मिळेल.
advertisement
स्टेप 3: मॅगी शिजवा
आता गरम दूध-पाण्याच्या मिश्रणात मॅगी आणि तिचं टेस्टमेकर घाला. मध्यम आचेवर 2-3 मिनिटं शिजवा, जोपर्यंत नूडल्स थोडे मऊ होत नाहीत.
स्टेप 4: मसाले आणि चीज घाला
आता सॉते केलेला कांदा-मिरची मिक्स त्यात मिसळा. त्यात पेरी पेरी पावडर, लसूण पावडर, कांदा पावडर आणि थोडं मीठ घाला. शेवटी चीज घालून हळूहळू ढवळा, जेणेकरून चीज पूर्णपणे वितळून मॅगीला क्रीमी टेक्स्चर मिळेल.
advertisement
स्टेप 5: सर्व्हिंग टच
मॅगी घट्ट आणि क्रीमी झाली की गॅस बंद करा. वरून थोडं किसलेलं चीज किंवा पेरी पेरी पावडर शिंपडा आणि गरमागरम सर्व्ह करा.
थंडीच्या संध्याकाळी, मूव्ही बघताना किंवा हलकी भूक लागली असताना ही दूधवाली चीज मॅगी अगदी परफेक्ट आहे. तिचा क्रीमी फ्लेवर आणि चीजचा सुगंध प्रत्येक बाईटला खास बनवतो. एकदा ट्राय करा. यानंतर तुमचा मॅगी खाण्याचा अंदाज कायमचा बदलणार.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2025 3:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
थंडीच्या दिवसांत खा गरमागरम दूध-चीज मॅगी; चव अशी की एकदा खाल्लात तर विसरू शकणार नाहीत


