अधिक महिन्यात जावयाला खूश करण्यासाठी ‘या’ पद्धतीनं करा अनारसे, पाहा सोपी रेसिपी
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
तुम्ही आजवर साखरेचे अनारसे खाल्ले असतील. पण, गुळाचे अनारसे कसे करायचे? याची सोपी रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
छत्रपती संभाजीनगर, 8 ऑगस्ट : सध्या अधिक महिना सुरू असून त्याला मोठं धार्मिक महत्त्व आहे. अधिक महिन्यात जावायाला वाण दिले जाते. यामध्ये 33 अनारस्यांचा समावेश असतो. तुम्ही आजवर साखरेचे अनारसे खाल्ले असतील. पण, गुळाचे अनारसे कसे करायचे? याची सोपी रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. छत्रपती संभाजीनगरच्या सिताराम साबू यांनी ही माहिती दिली आहे.
गुळाचे अनारसे तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपण दोन ग्लास भरून तांदूळ घ्यावे. हे तांदूळ अनारसे करण्याच्या तीन दिवस आधी स्वच्छ पाण्याने धुवून भिजत घालवे. त्यानंतर त्याला वाळवून त्याचं छान बारीक दळून पीठ तयार करून घ्यावा. हे पीठ चाळून नंतर त्यामध्ये दोन ग्लास अनारसासाठी यामध्ये साधारणपणे अर्धा किलो गूळ हा त्यात मिक्स करावा. त्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र करून त्याचे गोळे तयार करावे.
advertisement
हे गोळे तयार करून हवाबंद डब्यामध्ये साधारण एक दिवस ठेवावेत. त्यानंतर त्याला छान मळावे. त्याचे लहान-लहान गोळे तयार करुन आपण त्याला खसखशीमध्ये बोटांनी गोल फिरवून आकार द्यावा. तुम्ही यामध्ये मैदा देखील मिसळू शकता. हे तयार गोळे तेलात किंवा तुपात तळावे.
advertisement
अनारसे तयार करण्याची ही अतिशय सोपी पद्धत आहे. हे अनारसे खायला सुद्धा अतिशय चविष्ट आणि नरम असतात , अशी माहिती सिताराम बाबू यांनी दिली.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
August 08, 2023 11:32 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
अधिक महिन्यात जावयाला खूश करण्यासाठी ‘या’ पद्धतीनं करा अनारसे, पाहा सोपी रेसिपी