नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळलात? घरी झटपट बनवा कोकणी पद्धतीची आंबोळी, Recipe Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कोकणी पद्धतीची आंबोळी हा एक पारंपारिक पदार्थ असून तो घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे.
पुणे, 29 ऑगस्ट : महाराष्ट्राची खाद्य संस्कृती ही चांगलीच श्रीमंत आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा प्रत्येक भागात काही खास पदार्थ केले जातात. कोकणी पद्धतीची आंबोळी हा एक पारंपारिक पदार्थ असून तो घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे. कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यात हा पदार्थ तयार करता येतो. आंबोळी कशी बनवितात याची माहिती पुण्यातल्या सुरेखा जाधव यांनी दिली आहे.
आंबोळीसाठी साहित्य : 3 वाटी तांदळाचे पीठ.1/2 चमचा जिरे, 2 किंवा 3 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या ), कोथिंबीर (बारीक चिरलेली), मीठ (चवीनुसार ), तेल (आवश्यकतेनुसार)
आंबोळी बनवण्याची कृती : पारंपारिक आंबोळी बनवताना सर्वप्रथम जवारी तांदूळ घेवून तो स्वच्छ निवडून घ्या. त्यानंतर तो गिरणीतून किवा घरगुती चक्की मध्ये दळून त्याचे बारीक पीठ करून घ्या. हे पीठ तुम्ही डब्यामध्ये एक ते दोन महिने किंवा त्यापेक्षा जास्त दिवस साठवून ठेवू शकता.आता त्या दळून आणलेल्या पिठामधील 3 वाटी पीठ एका खोल भांड्यामध्ये घ्या म्हणजे ते आपल्याला चांगले कालवता येईल.
advertisement
या पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून त्यामधील गाठी फोडून घ्या आणि मग ते पीठ चांगले पातळ करा. त्यामध्ये जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि त्याच्यावर झाकण ठेवून ते 15 ते 20 मिनिटे चांगले भिजू द्या. त्यानंतर गॅसवर मध्यम आचेवर नॉन स्टिक तवा ठेवा तवा गरम झाला की त्यावर तेल सोडा आणि आंबोळीचे पीठ थोडे एकजीव करून ते वाटीने तव्यावर गोल पसरा. बाजूने तेल सोडल्यानंतर आंबोळी चांगली भाजेल, अशी माहिती जाधव यांनी दिली.
advertisement
आंबोळी हा पदार्थ सामान्यत: पिवळी बटाट्याची भाजी किंवा घट्ट खोबऱ्याच्या चटणी सोबत खाल्ला जातो.तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असाल तर मटन, चिकन रस्सा किंवा सुक्या बरोबर देखील आंबोळी खूप चांगली लागते, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 29, 2023 11:23 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळलात? घरी झटपट बनवा कोकणी पद्धतीची आंबोळी, Recipe Video