आरोग्यदायी कढीपत्त्याची चटणी खाल्लीये का? पाहा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी, Video

Last Updated:

कढीपत्ता अनेकजण नाश्त्यातून काढून टाकातात. पण आरोग्यदायी कढीपत्त्याची चटणी आपण आवडीने खाल.

+
News18

News18

वर्धा, 13 ऑक्टोबर: अनेकजण रोजच्या आहारात कढीपत्ता खाणे टाळतात. नाश्ता किंवा जेवणातून कढीपत्ता बाहेर काढून टाकतात. मात्र कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे त्याचं सेवन रोजच्या जेवणात करायला हवं. त्यासाठी जेवणात कढीपत्याची चटणी खाऊ शकता. ही चटणी इतकी चविष्ट बनते की कुणीही नको म्हणणार नाही. कमी साहित्यात आणि कमी वेळेत आरोग्यदायी रेसिपी कशी बनवायची हे वर्धा येथील जयश्री जायदे यांनी सांगितलंय.
कढीपत्त्याच्या चटणीसाठी साहित्य
1) कढीपत्त्याची स्वच्छ पाने 2)3-4 लाल मिरच्या 3) तीळ 4)मीठ 5) जिरे 6) लिंबू
कशी बनवायची कढीपत्त्याची चटणी?
सर्वप्रथम कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुऊन घ्यायची आणि कोरडी करून घ्यायची. एका कढईमध्ये तेल घालून तेल गरम झाल्यानंतर त्यात कढीपत्त्याची सर्व पाने टाकायची आहेत. कढीपत्त्याची पाने दोन ते तीन मिनिटे भाजून झाल्यानंतर त्यात लाल मिरच्या अ‍ॅड करून त्याही चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. नंतर जिरे, मीठ आणि तीळ अ‍ॅड करून चांगले एकत्र करून घ्यायचे. सर्व साहित्य दोन ते तीन मिनिटे भाजून घ्यायचे आहे. आता कढीपत्ता खमंग भाजून झाला असून कुरकुरीत झाला आहे. थोडं थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. त्यानंतर कढीपत्त्याच्या चटणीची चव वाढवण्यासाठी लिंबू पिळायचे आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यात थोडं खोबरं देखील अ‍ॅड करू शकता.
advertisement
कढीपत्ता काढून टाकू नका
कढीपत्ता अनेकांना नकोसा वाटतो. मात्र त्याचे फायदे भरपूर आहेत. अनेकांच्या घरी शुगरचे रुग्ण असले की त्यांच्याकडे ही रेसिपी आवर्जून बनवली जाते. कारण कढीपत्ता हा शुगर नियंत्रण ठेवण्यात मदत करतो. तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही मदत होते. केसांच्या समस्येवरही कढीपत्ता फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही देखील कमी वेळेत, कमी साहित्यात आणि घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून ही चविष्ट कढीपत्याची चटणी नक्की करून बघा.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
आरोग्यदायी कढीपत्त्याची चटणी खाल्लीये का? पाहा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement