जेवल्यानंतर बसल्या बसल्या करा हे छोटं काम; 400 शुगर लेवल असली तरी होईल कमी, तज्ज्ञांनी सांगितला उपाय

Last Updated:

एक सोपी आणि बसल्या जागेवर करता येणारी कसरत तुमच्या ब्लड शुगर लेव्हलमध्ये तब्बल 52% पर्यंत घट करू शकते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : जेवण जेवल्यानंतर अनेकांना डायबिटीज वाढण्याच्या समस्या उद्भवतात. खरंतर जेवणानंतर थोडंफार चालणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. पण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकाला त्यासाठी वेळ मिळेलच असं नाही. ज्यामुळे लोकांमध्ये ही समस्या मोठ्याप्रमाणात उद्भवते. मात्र, यावर एक सोपी आणि बसल्या जागेवर करता येणारी कसरत तुमच्या ब्लड शुगर लेव्हलमध्ये तब्बल 52% पर्यंत घट करू शकते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे.
मग आता करायचं काय? तर 'सोलस पुशअप'
डायबेटिस असो की वेळेची कमी, हा व्यायाम ठरेल फायदेशीर. नुकत्याच करण्यात आलेल्या एका आरोग्यविषयक अभ्यासानुसार, ‘सोलस पुशअप’ किंवा ‘सीटेड कॅफ रेज’ ही एक अत्यंत सोपी पायांची हालचाल शरीरातील साखरेच्या वापरावर मोठा परिणाम करू शकते. या व्यायामात शरीरातील पिंडल्यांमध्ये असलेल्या सोलस मसलला सक्रिय केलं जातं. जी रक्तातील साखर अधिक कार्यक्षमतेने वापरण्यास मदत करते.
advertisement
सोलस पुशअप म्हणजे काय?
हा व्यायाम कुणीही, कुठेही करू शकतो. कुर्सी, सोफा, कारची सीट किंवा ऑफिस डेस्कवर बसून.
का करायचा कसा?
पायाचा पुढचा भाग जमिनीवर ठेवावा. नंतर हळूहळू टाचा वर उचलाव्यात आणि पुन्हा खाली आणाव्यात. हे एका गतीने, काही मिनिटे आरामात करता येतं.
टीव्ही पाहताना, लॅपटॉपवर काम करताना किंवा फोन कॉलवर असताना सुद्धा हा व्यायाम सहज करता येतो. कोणत्याही उपकरणाची गरज लागत नाही आणि उभं राहण्याचीही आवश्यकता नाही.
advertisement
हे व्यायाम काम कसे करतो?
सोलस मसल ही पिंडल्यांमध्ये खोलवर असते. अन्य मोठ्या स्नायूंप्रमाणे ती पटकन थकत नाही. याउलट, ही स्नायू दीर्घकाळ चालणं किंवा हालचाल करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
NIH (National Institute of Health) च्या अभ्यासानुसार, सोलस मसल सक्रिय केल्याने शरीरात ‘ऑक्सिडेटिव मेटाबोलिझम’ वाढतो. ही एक प्रक्रिया आहे ज्यामुळे शरीर ग्लायकोजन वापरल्याशिवाय साखरेचं रूपांतर ऊर्जा स्वरूपात करू शकतं.
advertisement
अभ्यास काय सांगतो?
अभ्यासात असं आढळलं की जे लोक दिवसाचा जास्त वेळ बसून काम करतात, त्यांनी जर नियमितपणे ‘सोलस पुशअप’ केला, तर त्यांचा ब्लड शुगर लेव्हल ५२% पर्यंत घटतो, तर इन्सुलिन लेव्हलमध्ये 60% पर्यंत घट होते.
हा व्यायाम विशेषतः टाइप 2 डायबेटीस, प्री-डायबेटीस आणि बसून काम करणाऱ्या लोकांसाठी प्रभावी ठरू शकतो.
advertisement
(नोट : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
जेवल्यानंतर बसल्या बसल्या करा हे छोटं काम; 400 शुगर लेवल असली तरी होईल कमी, तज्ज्ञांनी सांगितला उपाय
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement