नाश्त्याला बनवा टेस्टी सोया पॅनकेक, लहानांसह मोठेही बोट चाटत बसतील

Last Updated:

कमी साहित्यात, झटपट पण तेवढेच पौष्टिक असणाऱ्या टेस्टी सोया पॅनकेकची रेसिपी जाणून घ्या.

नाश्त्याला बनवा टेस्टी सोया पॅनकेक
नाश्त्याला बनवा टेस्टी सोया पॅनकेक
अनेकदा नाश्त्याला घरातील मोठ्यांना आणि लहानांना आवडेल असा कोणता पदार्थ बनवावा असा प्रश्न गृहिणींसमोर असतो. तसेच तो पदार्थ पौष्टिक असणे देखील गरजेचे असते. तेव्हा कमी साहित्यात, झटपट पण तेवढेच पौष्टिक असणाऱ्या टेस्टी सोया पॅनकेकची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
सोया पॅनकेक बनवण्यासाठी सामग्री :
एक आणि अर्धा कप कप सोया चंक्स
2 हिरव्या मिरच्या
2 लसूण पाकळ्या
अर्धा इंच आल्याचा तुकडा
एक आणि अर्धा कप दही
2 चमचे तांदळाचे पीठ
3 चमचा बेसन
2 चमचा तीळ
किसलेला गाजर
किसलेली कोबी
कोथिंबीर
बारीक चिरलेला कांदा
एक लहान चमचा जिरे
मीठ चवीनुसार
advertisement
कृती :
सर्व प्रथम, सोयाबिनचे तुकडे भिजवून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात सोया चंक्स, दही, हिरवी मिरची, आले, लसूण टाकून चांगले वाटून घ्या. आता एका भांड्यात सर्व बारीक चिरलेल्या आणि किसलेल्या भाज्या घ्या. त्यात सोया चंक्सचे मिश्रण घाला. त्यात बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, जिरेपूड, गरम मसाला, कोथिंबीर टाका. सोबत पांढरे तीळ घाला. चांगले एकजीव करून घ्या. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून घट्ट पीठ बनवा.
advertisement
मग गॅसवर तवा गरम करा. तवा गरम झाल्यावर त्यावर तेल घालून त्यावर मिश्रण चमच्याने थोडेसे पसरवा. एका तव्यावर दोन ते तीन पॅनकेक बनवता येऊ शकतील. मिश्रण तव्यावर टाकताना ते पातळ ठेवा आणि मंद आचेवर सोनेरी रंग येई पर्यंत शिजवा. अशाप्रकारे सोया पॅनकेक तयार होतात जे तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
नाश्त्याला बनवा टेस्टी सोया पॅनकेक, लहानांसह मोठेही बोट चाटत बसतील
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement