Alarm Clock : अलार्म क्लॉकच्या आवाजानं होऊ शकतं तब्येतीचं नुकसान, हृदय आणि मेंदूसाठी ठरु शकतं घातक

Last Updated:

काही वेळा अलार्मच्या मोठ्या आवाजामुळे खूप दचकायला होतं. या आवाजामुळे अचानक जागं होणं आरोग्याला हानी पोहोचवू शकतं. अलार्मच्या मोठ्या आवाजानं जाग येते पण अचानक जागं झाल्यानं हृदयाची गती वाढते आणि ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

News18
News18
मुंबई : दिवसाची सुरुवात होते अलार्मच्या आवाजानं. काही वेळा फोनच्या किंवा काही वेळा घड्याळाच्या अलार्मनं दिवस सुरु होतो. वेळेवर जाग यावी यासाठी ही पद्धत आहे.
काही वेळा अलार्मच्या मोठ्या आवाजामुळे खूप दचकायला होतं. या आवाजामुळे अचानक जागं होणं आरोग्याला हानी पोहोचवू शकतं. अलार्मच्या मोठ्या आवाजानं जाग येते पण अचानक जागं झाल्यानं हृदयाची गती वाढते आणि ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
स्ट्रेस रिसपॉन्स - आपण गाढ झोपेत असतो आणि अचानक मोठा अलार्म ऐकू येतो तेव्हा 'फाइट ऑर फ्लाइट' या स्थितीत जातो. यामुळे कॉर्टिसोल आणि अ‍ॅड्रेनालाईन या तणाव संप्रेरकांच्या पातळीत झपाट्यानं वाढ होते.
advertisement
हृदयाचे ठोके अचानक वाढतात, रक्तदाब वाढतो आणि संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह बदलतो. हे वारंवार घडलं तर उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि चयापचय समस्यांचा धोका वाढू शकतो.
मानसिक आरोग्यावर परिणाम - मोठ्या आवाजात जागे होणं दिवसभर मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतं. अशा प्रकारे जागं होणाऱ्यांचा दिवस चिडचिडेपणानं सुरू होतो. लक्ष केंद्रित करण्याची क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. भविष्यात, यामुळे चिंता आणि नैराश्याची लक्षणं वाढू शकतात.
advertisement
स्लीप सायकल - झोपेचं चक्र विस्कळीत होणं - आपल्या झोपेचं चक्र नव्वद मिनिटांच्या चक्रात घडतं, ज्यात हलकी झोप, गाढ झोप आणि REM अशा अवस्था असतात. गाढ झोप किंवा REM चक्रांमधे अचानक जागं होणं  यामुळे झोपेत व्यत्यय येतो. यामुळे दिवसभर थकवा जाणवतो, तंद्री असते आणि ताकद कमी जाणवते.
advertisement
हे टाळण्यासाठी काय करता येईल ?
- सकाळी जाग होण्यासाठी मोठ्या आवाजाचा अलार्म वापरू नका. त्याऐवजी, सौम्य आवाज किंवा हळूहळू मोठा होणारा अलार्म वापरा. ​​यामुळे शरीराला धक्का बसणार नाही.
- सकाळी ताजंतवानं वाटावं यासाठी दररोज किमान सात-आठ तास झोप घ्या.
- झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. यामुळे शरीराचं घड्याळ सेट होईल आणि दररोज त्यावेळी आपोआप जागे येईल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Alarm Clock : अलार्म क्लॉकच्या आवाजानं होऊ शकतं तब्येतीचं नुकसान, हृदय आणि मेंदूसाठी ठरु शकतं घातक
Next Article
advertisement
Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement