IND vs SA : T20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, सगळ्यात मोठ्या फिनिशरचं कमबॅक, दोघांना डच्चू!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेटमधल्या सगळ्यात मोठ्या फिनिशरचं टीम इंडियात कमबॅक झालं आहे, तर दोन जणांना डच्चू देण्यात आला आहे.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. आशिया कपच्या फायनलवेळी दुखापत झालेल्या ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचं टीम इंडियात कमबॅक झालं आहे, तर टी-20 टीमचा उपकर्णधार शुभमन गिल हादेखील पुनरागमन करणार आहे, पण गिलचं पुनरागमन त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टवेळी गिलच्या मानेला दुखापत झाली होती, त्यामुळे तो दुसरी टेस्ट आणि वनडे सीरिजलाही मुकला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये विश्रांती दिलेल्या जसप्रीत बुमराहचंही टी-20 टीममध्ये कमबॅक झालं आहे.
नितीश-रिंकूला डच्चू
दुसरीकडे नितीश कुमार रेड्डी आणि रिंकू सिंग या दोन्ही ऑलराऊंडरना भारताच्या टी-20 टीममधून डच्चू देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टी-20 सीरिजमध्ये हे दोन्ही ऑलराऊंडर टीममध्ये होते.
भारतामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, या वर्ल्ड कपआधी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध 5 टी-20 मॅच खेळणार आहे, त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी टीम इंडियाकडे आता फक्त 10 मॅच शिल्लक आहेत. या 10 सामन्यांमध्येच कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कोच गौतम गंभीर यांना टीम कॉम्बिनेशन निश्चित करावं लागणार आहे.
advertisement
भारताची टी-20 टीम
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर
टी-20 सीरिजचं वेळापत्रक
पहिली टी-20- 9 डिसेंबर, कटक
दुसरी टी-20- 11 डिसेंबर, चंडीगढ
तिसरी टी-20- 14 डिसेंबर, धर्मशाला
advertisement
चौथी टी-20- 17 डिसेंबर, लखनऊ
पाचवी टी-20- 19 डिसेंबर, अहमदाबाद
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 5:52 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : T20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, सगळ्यात मोठ्या फिनिशरचं कमबॅक, दोघांना डच्चू!


