रिलेशनशिपमध्ये गोंधळच गोंधळ? 'या' 5 लक्षणांवरून कळेल तुम्ही 'सिचुएशनशिप' मध्ये अडकला आहात की नाही

Last Updated:

सुरुवातीला ते सहज आणि मोकळं वाटतं, पण जसजसा वेळ जातो, तसतसं यातून गोंधळ आणि ताण निर्माण होतो. चला जाणून घेऊया कोणते संकेत सांगतात की तुम्ही सिचुएशनशिपमध्ये आहात आणि यातून कसं बाहेर पडता येईल.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आजच्या काळात नाती खूपच गुंतागुंतीची झाली आहेत. काही नाती मैत्रीच्या पलीकडे जातात, पण त्यांना नाव देणे कठीण होते. कधी कधी आपण कोणाच्या खूप जवळ जातो, एकत्र वेळ घालवतो, पण तरीही ते नातं काय आहे हे स्पष्ट होत नाही. यालाच आजकाल “सिचुएशनशिप” म्हटलं जातं. हे ना पूर्णपणे मैत्री असतं, ना पूर्णपणे रिलेशनशिप.
सुरुवातीला ते सहज आणि मोकळं वाटतं, पण जसजसा वेळ जातो, तसतसं यातून गोंधळ आणि ताण निर्माण होतो. चला जाणून घेऊया कोणते संकेत सांगतात की तुम्ही सिचुएशनशिपमध्ये आहात आणि यातून कसं बाहेर पडता येईल.
नात्यात स्पष्टता नसणे : तुम्ही दोघं एकत्र असता पण त्या नात्याला नावच दिलेलं नसतं. ना ते पूर्णपणे मैत्री असतं ना रिलेशनशिप. जर महिन्यांनंतरही हेच सुरू असेल, तर ते सिचुएशनशिप आहे. खऱ्या नात्याचं बळ हे भविष्याच्या नियोजनात असतं. पण जर तुमचा जोडीदार कधीच भविष्याबद्दल बोलत नसेल, तर तो कमिटमेंट टाळत आहे असं समजा.
advertisement
भावनिक आधाराचा अभाव : गरजेच्या वेळी जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहत नसेल आणि फक्त कॅज्युअल भेटींवर नातं टिकत असेल, तर ते खरं नातं नाही.
फक्त सोयीसाठी भेटणं : नातं जर फक्त त्याच्या सोयीप्रमाणे चालत असेल आणि तुमच्यासाठी वेळ देणं त्याची प्राथमिकता नसेल, तर हेही संकेत आहेत.
नेहमी गोंधळ आणि असुरक्षितता जाणवणं : सतत मनात प्रश्न असतो की तुम्ही नेमके कुठे आहात? जर नात्याबद्दल भीती, गोंधळ आणि असुरक्षितता वाटत असेल, तर हेही सिचुएशनशिपचं लक्षण आहे.
advertisement
यातून बाहेर कसं पडायचं?
खुलं बोलणं गरजेचं आहे. तुमच्या जोडीदाराला स्पष्ट विचारलं पाहिजे की तो हे नातं कुठे नेऊ इच्छितो.
स्वतःच्या भावनांना महत्त्व द्या. फक्त त्याच्या विचारांवर चालू नका, स्वतःच्या भावना ओळखा.
मर्यादा ठरवा जर जोडीदार कमिटमेंटपासून पळत असेल, तर तुमच्या नात्याला सीमा द्या.
जर नातं तुम्हाला त्रास देत असेल, तर धाडसाने त्यातून बाहेर पडा.
advertisement
नातं संपल्यावर स्वतःला समजून घ्या, मित्र-परिवारासोबत वेळ घाला आणि नवीन सुरुवात करा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
रिलेशनशिपमध्ये गोंधळच गोंधळ? 'या' 5 लक्षणांवरून कळेल तुम्ही 'सिचुएशनशिप' मध्ये अडकला आहात की नाही
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement