Tree Planet : झाडांची लागवड करायचीय? नर्सरीमध्ये करा खरेदी, तुमच्यासाठी हे ठिकाण बेस्ट ऑप्शन!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
झाडांची लागवड करायला अनेक जणांना आवडते. हिना रोज नर्सरी ही तुमच्यासाठी एक उत्तम खरेदीसाठी ऑप्शन ठरू शकते.
बीड : झाडांची लागवड करायला अनेक जणांना आवडते. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल, झाडांवर मनापासून प्रेम करत असाल तर बीड जिल्ह्यातील माजलगाव शहराजवळील हिना रोज नर्सरी ही तुमच्यासाठी एक उत्तम खरेदीसाठी ऑप्शन ठरू शकते. या नर्सरीत तुम्हाला विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडे आणि शोभिवंत झाडे मिळतात. विशेष म्हणजे इथे झाडांची किंमत अत्यंत वाजवी असून सामान्य ग्राहकांसाठी परवडणारी आहे.
हिना रोज नर्सरीचे मालक अल्ताफ मिर्झा हे गेल्या अनेक वर्षांपासून झाडांची शेती करत आहेत. त्यांनी नर्सरीमध्ये शेकडो प्रकारची झाडे उपलब्ध करून दिली आहेत. त्यांनी सांगितले की इतर नर्सरीमध्ये जी झाडे 500 रुपये किंमतीला मिळतात तीच झाडे त्यांच्या नर्सरीत 250 ते 300 रुपयांपर्यंत सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे कमी खर्चात अधिक झाडे खरेदी करण्याची संधी येथे ग्राहकांना मिळते.
advertisement
या नर्सरीत तुम्हाला गुलाब, मोगरा, जाई, जुईसारखी फुलझाडे तर मिळतीलच, पण सोबतच सिताफळ, आवळा, लिंबू, पेरू, संत्रा, चिकू, आंबा यासारखी फळझाडेही उपलब्ध आहेत. त्याचबरोबर शोभिवंत आणि छायादायक झाडांमध्ये अशोक, कडुनिंब, फायकस, बॉटल पाम, अरेका पाम, क्रोटन यांसारख्या वनस्पतींचाही समावेश आहे.
advertisement
ग्राहकांसाठी ही नर्सरी एक पर्वणीच ठरली आहे. कमी दरात उत्तम प्रतीची झाडे मिळाल्यामुळे माजलगावसह बीड जिल्ह्यातून अनेक लोक येथे खरेदीसाठी येतात. विवाह सोहळा, घरगुती कार्यक्रम किंवा गिफ्टसाठी झाडे खरेदी करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
May 08, 2025 7:21 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tree Planet : झाडांची लागवड करायचीय? नर्सरीमध्ये करा खरेदी, तुमच्यासाठी हे ठिकाण बेस्ट ऑप्शन!

