advertisement

Health Awareness : झिरो शुगर आणि डाएट ड्रिंकच्या नावाखाली तुम्ही पिताय गोड विष! तज्ज्ञांनी सांगितले कडू सत्य

Last Updated:

Zero sugar and diet drinks side effects : नावातच शुगर नसल्यामुळे हे ड्रिंक्स आरोग्यासाठी सुरक्षित असतील, असा गैरसमज अनेकांचा असतो. पण डॉक्टरांच्या मते, या ड्रिंक्सचा नियमित वापर हळूहळू शरीराला गंभीर नुकसान पोहोचवू शकतो.

आर्टिफिशियल स्वीटनर्सचे दुष्परिणाम
आर्टिफिशियल स्वीटनर्सचे दुष्परिणाम
मुंबई : आजकाल वजन कमी करणे, डायबिटीज नियंत्रणात ठेवणे किंवा फिट राहण्यासाठी अनेक जण ‘झिरो शुगर’ किंवा ‘डाएट ड्रिंक्स’ कडे वळत आहेत. नावातच शुगर नसल्यामुळे हे ड्रिंक्स आरोग्यासाठी सुरक्षित असतील, असा गैरसमज अनेकांचा असतो. पण डॉक्टरांच्या मते, या ड्रिंक्सचा नियमित वापर हळूहळू शरीराला गंभीर नुकसान पोहोचवू शकतो. डॉ. तरंग कृष्णा यांनी यामागचे वास्तव स्पष्ट करत काही चिंताजनक गोष्टी समोर आणल्या आहेत.
इंस्टाग्रामवर डॉ. तरंग कृष्णा यांनी याबद्दल सविस्तर माहिती डेली आहे. ते सांगतात की, झिरो शुगर ड्रिंक्सबाबत लोक जेवढं सुरक्षित समजतात, ते खरं तर इतकं सुरक्षित नाही. या ड्रिंक्समध्ये साखरेऐवजी वापरले जाणारे घटक शरीरावर वेगळाच परिणाम करतात, जो दीर्घकाळात धोकादायक ठरू शकतो.
डॉ. कृष्ण यांनी सांगितले काय होतात दुष्परिणाम..
- झिरो शुगर ड्रिंक्समध्ये साखरेऐवजी एस्पार्टेम, सुक्रालोज यांसारखे आर्टिफिशियल स्वीटनर्स वापरले जातात. हे घटक साखरेपेक्षा शेकडो पटीने गोड असतात आणि त्यात कॅलरी अगदीच कमी असतात.
advertisement
- कॅलरी वाचत असल्या तरी हे स्वीटनर्स मेंदूला गोंधळात टाकतात. गोड चव घेतल्यावर शरीर कॅलरी मिळण्याची अपेक्षा करते. पण कॅलरी न मिळाल्याने शरीराला पुन्हा गोड किंवा जास्त कॅलरी असलेले अन्न खाण्याची तीव्र इच्छा होते.
- या ड्रिंक्समध्ये खरी साखर नसली, तरी त्यांची गोड चव शरीराच्या इन्सुलिन रिस्पॉन्सवर परिणाम करू शकते. काही संशोधनांनुसार, आर्टिफिशियल स्वीटनर्सचा नियमित वापर मेटाबॉलिझम मंदावू शकतो. यामुळे भविष्यात टाइप-2 डायबिटीज आणि मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढण्याची शक्यता असते, जी बाब आरोग्यासाठी अत्यंत गंभीर आहे.
advertisement
- आपल्या पोटात असलेले ‘गुड बॅक्टेरिया’ पचनक्रिया, इम्युनिटी आणि एकूण आरोग्य सांभाळतात. झिरो शुगर ड्रिंक्समधील केमिकल्स या चांगल्या बॅक्टेरियांचा समतोल बिघडवू शकतात.
- जेव्हा गट हेल्थ खराब होते, तेव्हा त्याचा परिणाम फक्त पचनावरच नाही तर मूड, ऊर्जा पातळी आणि त्वचेच्या आरोग्यावरही होतो.
- सन 2023 मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) एक इशारा दिला होता. त्यानुसार, दीर्घकाळ आर्टिफिशियल शुगरचे सेवन केल्यास कॅन्सरचा धोका वाढू शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
झिरो शुगर ड्रिंक्सऐवजी हेल्दी पर्याय कोणते?
झिरो शुगर ड्रिंक्सऐवजी काही नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय निवडणे केव्हाही चांगले ठरते. साखर न घातलेले किंवा थोड्या मधासह लिंबूपाणी घ्या. तसेच तुम्ही नारळपाणी, हर्बल टी किंवा ब्लॅक कॉफी घेऊ शकता. त्याचबरोबर इन्फ्यूज्ड वॉटर, म्हणजे पाण्यात काकडी, पुदीना किंवा फळांचे तुकडे घालून तयार केलेले पाणीदेखील चांगला पर्याय आहे.
advertisement
एकूणच, झिरो शुगर ड्रिंक्स तात्पुरते फायदेशीर वाटले तरी दीर्घकाळासाठी ते आरोग्याला हानीकारक ठरू शकतात. त्यामुळे ‘डाएट’ या नावाला भुलू नका, तर नैसर्गिक आणि शरीराला पोषक पर्यायांकडेच वळा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Awareness : झिरो शुगर आणि डाएट ड्रिंकच्या नावाखाली तुम्ही पिताय गोड विष! तज्ज्ञांनी सांगितले कडू सत्य
Next Article
advertisement
Ajit Pawar: अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ! सुनेत्रा पवार राज्यात, दिल्लीत कोणाला संधी?
अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ! सुनेत्रा पवार राज्यात, दिल्ल
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आ

  • अजितदादांनी अकाली घेतलेल्या एक्झिटने राज्यातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजक

  • अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राजकीय जागांवर आता पवार कुटुंबातील

View All
advertisement