शेतकऱ्यांनो तुमचं खत बनावट तर नाही? साताऱ्यातील कारखान्यावर कृषी विभागाची धाड, गुजरातचा माल
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
सातारा जिल्ह्यात वडूज येथे बनावट खत कारखान्यावर कृषी विभागाने धाड टाकली असून २५ लाख रुपयांचा माल कृषी विभागाने जप्त केला.
सचिन जाधव, प्रतिनिधी, सातारा : सातारा जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे बनावट खत तयार करणाऱ्या रॅकेटचे पर्दाफाश करण्यात कृषी विभागाला यश आले आहे. साताऱ्यातील वडूज परिसरात सुरू असलेल्या अवैध बनावट खत कारखान्यावर कृषी विभागाने पोलिसांच्या मदतीने धाड टाकत संपूर्ण कारखाना सील केला आहे.
या कारखान्यात तयार होणाऱ्या बनावट खतासाठी लागणारा कच्चा माल गुजरातमधील भावनगर येथून आणला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करत निकृष्ट दर्जाची खते बाजारात विकली जात होती, आणि त्यामागे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे संकेत मिळत आहेत.
या रॅकेटचे जाळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांपर्यंत पसरले असल्याचा संशय असून, तपास यंत्रणांनी चौकशीचा फास आवळला आहे. कृषी विभागाने केलेल्या कारवाईत 25 लाख रुपये किमतीचे बनावट खत जप्त करण्यात आले असून कोट्यावधी रुपयांचा माल यामध्ये विक्री केला असावा असा संशय व्यक्त होत असून याचा सखोल तपास सध्या पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे
Location :
Satara,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 7:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शेतकऱ्यांनो तुमचं खत बनावट तर नाही? साताऱ्यातील कारखान्यावर कृषी विभागाची धाड, गुजरातचा माल










