मोठी बातमी! मुलीची छेड काढणं जीवावर बेतलं; जमावाकडून आरोपीची हत्या, अहमदनगर हादरलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.
अहमदनगर, 12 डिसेंबर, हरिष दिमोटे : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. चार महिलांच्या हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्त झालेल्या व्यक्तीची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. अण्णा वैद्य असं जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. अकोला तालुक्यातील सुगाव गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अकोला तालुक्यातील सुगावमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या जमावानं अण्णा वैद्य याच्या घरावर हल्ला केला. छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असतानाच जमाव आक्रमक झाला. जमावाच्या हल्ल्यामध्ये अण्णा वैद्य गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीनं संगमनेर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले.
advertisement
दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या अण्णा वैद्य याच्यावर 2011 साली चार महिलांची हत्या केल्याचा आरोप होता. या प्रकरणात जिल्हा न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र त्यानंतर उच्च न्यायालयानं त्याची निर्दोष मुक्तता केली. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
Location :
Ahmadnagar,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
December 11, 2023 8:27 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
मोठी बातमी! मुलीची छेड काढणं जीवावर बेतलं; जमावाकडून आरोपीची हत्या, अहमदनगर हादरलं


