नगरमध्ये पोलीस निरीक्षकाचा तरुणीवर अत्याचार, दोन वर्षांपासून सुरू होता नको तो प्रकार

Last Updated:

अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथं एका पोलीस उपनिरीक्षकाने एका ३० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे.

News18
News18
अहिल्यानगर: अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथं एका पोलीस उपनिरीक्षकाने एका ३० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. लग्नाचं आमिष दाखवून आरोपी पोलिसाने तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवले. पण त्यानंतर आरोपीनं पीडितेशी लग्न करण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितेनं तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पालघर आणि मुंबईमध्ये घडली असल्याने हा गुन्हा पुढील तपासासाठी पालघर येथील मनोर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे.
प्रताप दराडे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. ३० वर्षीय पीडित तरुणी ही मूळची पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून ती सध्या मुंबईत राहते. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२३ मध्ये मुंबईतील जुहू येथील एका रेस्टॉरंटमध्ये तिची ओळख पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याशी झाली. त्यावेळी दराडे यांनी तिला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा प्रकार अनेक महिने सुरू होता.
advertisement
काही काळानंतर, तरुणीने दराडे यांच्याकडे लग्नाचा आग्रह धरला. मात्र, दराडे यांनी लग्नास नकार देत त्यांच्यातील संबंध विसरून जाण्यास सांगितले. या घटनेनंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि दराडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर, तोफखाना पोलिसांनी तातडीने दराडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मनोर पोलीस करणार आहेत.
advertisement
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्यावरच अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कायद्याचे रक्षकच जर अशा प्रकारे गैरकृत्य करत असतील तर सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
नगरमध्ये पोलीस निरीक्षकाचा तरुणीवर अत्याचार, दोन वर्षांपासून सुरू होता नको तो प्रकार
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement