बायकोशी झालं भांडण अन् बापानेच पोटच्या मुलांना फेकलं विहिरीत; बहीण-भावाचा गेला जीव

Last Updated:

मुलांवर आई-वडिलांपेक्षा अधिक आणि निस्वार्थ प्रेम कोणी करु शकत नाही असं म्हटलं जातं. स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला सारुन ते आपल्या लेकरांनी जीव लावतात. मात्र हेच आई-वडिल आपल्याच मुलांच्या जीवावर उठतील याचा कधी विचार केलाय का?

बापानेच पोटच्या मुलांना फेकलं विहिरीत
बापानेच पोटच्या मुलांना फेकलं विहिरीत
साहेबराव कोकणे, अहमदनगर, 7 ऑगस्ट : मुलांवर आई-वडिलांपेक्षा अधिक आणि निस्वार्थ प्रेम कोणी करु शकत नाही असं म्हटलं जातं. स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला सारुन ते आपल्या लेकरांना जीव लावतात. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाही. मात्र हेच आई-वडिल आपल्याच मुलांच्या जीवावर उठतील याचा कधी विचार केलाय का? एका वडिलांनी आपल्या दोन मुलांना विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.
वडिलांनी आपल्याच दोन मुलांना विहिरीत फेकून देत ठार केलं. रागाच्या भरात व्यक्तीनं हे धक्कादायक पाऊल उचललं. पत्नीसोबत भांडण झालं म्हणून नराधम बापानं हे पाऊल उचललं. अहमदनगर मधील या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथे विहिरीत बहीण-भावंडाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी 6 ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली. याबाबत पोलीस पाटील विजयकुमार अनारसे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात खबर दिली. विहिरीतील पाण्यात बुडन मृत्यू झालेल्या ऋतुजा गोकुळ क्षीरसागरचं वय 8 वर्ष होतं आणि मुलगा वेदांत गोकुळ क्षीरसागरचं वय 4 वर्ष होतं. दोघेही अळसुंदे, ता. कर्जत, येथे रहायचे.
advertisement
कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथे निंबे रस्त्यालगतच्या गोकुळ क्षीरसागर यांच्या विहिरीत मुलीची सँडल दिसत असल्याची माहिती मिळाली. पोलीस पाटील यांच्यासह गावातील काही मंडळींनी जाऊन विहिरीच्या पाण्यात काट्या टाकल्या. त्या काट्या वर ओढल्या असता काट्याला गुंतून मुलगी ऋतुजा गोकुळ आणि मुलगा वेदांत गोकुळ क्षीरसागर या बहीण-भावाचा मृतदेह वर आला. मृतदेह मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय कर्जत या ठिकाणी आणण्यात आला असता वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांना मृत घोषित केले. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.
advertisement
पत्नी सोबत भांडण झाले म्हणून दोन मुलांना विहिरीत फेकल्याप्रकरणी वडील गोकुळ शिरसागर यांच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात असून त्याला अटक केली आहे.
view comments
मराठी बातम्या/अहमदनगर/
बायकोशी झालं भांडण अन् बापानेच पोटच्या मुलांना फेकलं विहिरीत; बहीण-भावाचा गेला जीव
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement