शिवीगाळ, नग्न करून मारहाण; कोपर्डी घटनेतील आरोपीच्या चुलत भावाची आत्महत्या
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
तमाशात नाचल्यानं विठ्ठलला शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. त्याला कपडे काढून नग्नावस्थेत मारहाण केली गेली.
अहमदनगर : कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाने आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. मागासवर्गीय तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून, नग्न करत मारहाण करण्यात आली. यामुळे व्यथित झालेल्या तरुणाने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला. या प्रकरणी तिघांविरोधात गु्हा दाखल झाला असून यामध्ये कोपर्डी घटनेतील पीडित मुलीच्या भावाचाही समावेश आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विठ्ठल कांतीलाल शिंदे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्या वडिलांनी कर्जत पोलिसात तक्रार दाखल केली. विठ्ठलचं १ मे रोजी कोपर्डीत भैरवनाथ यात्रेवेळी तमाशात भांडण झालं. तेव्हा दिनेश बाबासाहेब सुद्रिक, स्वप्निल सुद्रिक, वैभव सुद्रिक यांनी मारहाण केली. तेव्हा मुलाची चौकशी करायला घरी गेल्यावर तो घरीच आला नसल्याचं समजलं. थोड्या वेळाने विठ्ठल स्मशानभूमीत नग्नावस्थेत असल्याचं समजलं. तिथून त्याला घरी आणलं.
advertisement
तमाशात नाचल्यानं विठ्ठलला शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. त्याला कपडे काढून नग्नावस्थेत मारहाण झाली. आपल्याला अपमानित केल्यानं जगण्याची इच्छा नसल्याचं विठ्ठल म्हणाल्याचं त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. बुधवारी विठ्ठलसोबत घडलेल्या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी बाबुराव गोपाळ शिंदे यांच्या घरी त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्याच्या खिशात एक चिठ्ठीही आढळली असून त्यात माझे जीवन संपवत आहे आणि याला बंटी सुद्रिक, स्वप्निल सुद्रिक कारणीभूत आहेत असं लिहिलंय. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे.
advertisement
कोपर्डी घटनेतील आरोपीचा चुलत भाऊ
view commentsकोपर्डीत १३ जुलै २०१६ रोजी एका शालेय मुलीवर अत्याचार झाला होता. या घटनेनंतर मराठा समाजाने मूक मोर्चे राज्यभरात काढले होते. या प्रकरणात जितेंद्र बाबूलाल शिंदे हा मुख्य आरोपी होता. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र तुरुंगातच त्याने आत्महत्या केली. तर विठ्ठल शिंदे हा आरोपी जितेंद्रचा चुलत भाऊ आहे. त्याने जितेंद्रच्या घरीच गळफास घेऊन जीवन संपवलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 03, 2024 9:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
शिवीगाळ, नग्न करून मारहाण; कोपर्डी घटनेतील आरोपीच्या चुलत भावाची आत्महत्या


