Ramgiri Maharaj Controversy : रामगिरी महाराजांविरोधात मुस्लिम समाज आक्रमक; नगरमध्ये मोर्चा काढत रस्तारोको

Last Updated:

Ramgiri Maharaj Controversy : महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी मुस्लिम समाजाने अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला.

News18
News18
अहमदनगर : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सरला बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमामध्ये मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विधान केलंय. या वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे वैजापूर येथे तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्या वतीने वैजापूरमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेचे पडसाद आता नगरमध्ये उमटल्याचे पाहायला मिळाले.
नगरमध्ये मोर्चा काढून निषेध
मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे मुस्लिम समाजाने आक्रमक भूमिका घेतली होती. याचा निषेध करण्यासाठी आज अहमदनगरमध्ये कुठला स्टॅन्ड ते डीएसपी चौक असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे रूपांतर नंतर रस्ता रोकोमध्ये करण्यात आले. यावेळी महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम बांधवांनी केली आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान मुस्लिम धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमुळे छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता.
view comments
मराठी बातम्या/अहमदनगर/
Ramgiri Maharaj Controversy : रामगिरी महाराजांविरोधात मुस्लिम समाज आक्रमक; नगरमध्ये मोर्चा काढत रस्तारोको
Next Article
advertisement
Nanded Crime News : 'तुझं लग्न लावून देतो',  आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

View All
advertisement