'देशाला हुकूमशाहीकडे नेण्याची वाटचाल, ज्यांनी टीका केली त्यांना..' पवारांचा पुन्हा हल्लाबोल

Last Updated:

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

News18
News18
अहमदनगर, साहेबराव कोकणे प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. 'काळया आईशी इमान राखणारं हे सरकार नाही, ही निवडणूक देशाची आहे या निवडणुकीत भूमिका घेतली पाहिजे. सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली, मात्र गुजरातमध्ये शेतकऱ्यांना निर्यात करण्यास परवानगी मग महाराष्ट्र का नाही?' असा सवाल करतानाच 'देशाला हुकूमशाहीकडे नेण्याची वाटचाल सुरू असल्याची' टीका शरद पवार यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार? 
'ही निवडणूक देशाची आहे या निवडणुकीत भूमिका घेतली पाहिजे. सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली, मात्र गुजरातमध्ये शेतकऱ्यांना निर्यात करण्यास परवानगी मग महाराष्ट्र का नाही?' असा सवाल यावेळी शरद पवार यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'काळा पैसा आला नाही, सर्वसामान्य माणसाच्या खात्यात पैसे आले नाही. सतेचा गैरवापर होत आहे, विरोधकांवर टीका करण्याचा अधिकार आहे, मात्र ज्यांनी टीका केली त्यांना जेलमध्ये टाकल्याचं' शरद पवार यांनी म्हटलं आहे.
advertisement
'निलेश लंके यांनी कोव्हिड काळात लोकांना मदत केली, मात्र तेव्हा विरोधक घरात बसले होते. जिल्ह्यात पाणि आणि एमआयडीसीच्या प्रश्नावर लक्ष देण्याची अधिक गरज आहे. जिल्ह्याची पाहिजे तशी प्रगती झालेली नाही. विरोधी उमेदवाराकडून प्रश्न सुटू शकत नाहीत. पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपालिका यांच्या निवडणूका का होत नाही, कारण सरकारला लोकशाहीवर विश्वास नाही म्हणून निवडणुका नाहीत,' असा हल्लाबोलही यावेळी शरद पवार यांनी केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
'देशाला हुकूमशाहीकडे नेण्याची वाटचाल, ज्यांनी टीका केली त्यांना..' पवारांचा पुन्हा हल्लाबोल
Next Article
advertisement
Nanded Crime News : 'तुझं लग्न लावून देतो',  आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

View All
advertisement