Maharashtra politics : भुजबळ राष्ट्रवादी सोडणार का? आतली बातमी समोर

Last Updated:

छगन भुजबळ हे पक्षावर नाराज आहेत, तसेच ते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

News18
News18
अहमदनगर, हरिष दिमोटे, प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच आता छगन भुजबळ हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असून ते घरवापसीच्या तयारीत आहेत. भुजबळ यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. मात्र हे वृत्त भुजबळांनी फेटाळून लावलं आहे.  आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही, तसंच आपला ठाकरेंच्या कोणत्याही नेत्याशी संपर्क झाला नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भुजबळांच्या नाराजीवर प्रतिक्रिया देताना मोठा खुलासा केला आहे.
नेमकं काय म्हणाले तटकरे? 
भुजबळ यांच्या बद्दलच्या चर्चा निरर्थक आहेत. भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. पक्षाच्या जडणघडणीत आणि भुमिकांमध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल आहे. या चर्चा निव्वळ अफवा असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना तटकरे म्हणाले की, नाशिक लोकसभेच्या बाबतीत त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. त्यावेळी योग्य निर्णय होऊ शकला नाही. राज्यसभेसाठी भुजबळ इच्छुक होते, मात्र पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत सर्वानुमते सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले.  भुजबळ सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे पक्षात नाराजी असण्याचं काही कारण नाही.
advertisement
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मराठा-ओबीसी आरक्षणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीच्या सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. आरक्षणासंदर्भात ज्या भावना निर्माण झाल्यात त्याचं निरसन करण्याचं काम आमचं सरकार करेल असं तटकरे यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Maharashtra politics : भुजबळ राष्ट्रवादी सोडणार का? आतली बातमी समोर
Next Article
advertisement
Nanded Crime News : 'तुझं लग्न लावून देतो',  आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

View All
advertisement