विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू, सुप्रिया सुळेंची एका शब्दात प्रतिक्रिया, स्टेटसमध्ये म्हणाल्या...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Ajit Pawar Passes Away Latest News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Ajit Pawar Passes Away Latest News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. आज सकाळी ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी बारामतीत येणार होते. मात्र बारामती विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या विमानाला अपघात झाला. या अपघातात अजित पवांरासह एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एका प्रमुख नेत्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
अजित पवारांचा अशाप्रकारे विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि अजित पवारांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अवघ्या एका शब्दांत ही प्रतिक्रिया दिली. त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस अपलोड करत 'Devastated' असं लिहिलं आहे. devastated अर्थात मन सुन्न झालं, असं त्यांनी स्टेटमध्ये म्हटलं आहे. सुप्रिया सुळे सध्या दिल्लीत आहेत. अजित पवारांच्या मृत्यूची बातमी समजताच त्या बारामतीच्या दिशेनं रवाना झाल्या आहेत.
advertisement

नेमकं काय घडलं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान लँडिंगच्या स्थितीत असताना वैमानिकाने सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र, त्याच निर्णायक क्षणी विमानात तांत्रिक बिघाड उद्भवला. लँडिंगदरम्यान विमानावरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तांत्रिक त्रुटीमुळे विमानाने दिशा बदलली असावी किंवा इंजिनमध्ये काही समस्या निर्माण झाली असावी, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
advertisement
अपघात नेमका कशामुळे झाला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. याबाबत सध्या तपास सुरू असून तांत्रिक बिघाड, हवामान आणि इतर कारणांचा सखोल अभ्यास केला जात आहे. ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतरच या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.
तपास यंत्रणांच्या मते, 'ब्लॅक बॉक्स' (Black Box) हाती आल्यानंतरच या दुर्घटनेचे नेमके आणि अचूक कारण स्पष्ट होईल. विमानाच्या उड्डाणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंतचा सर्व डेटा आणि वैमानिकांचे संभाषण यात रेकॉर्ड केलेले असते, त्यामुळे हा पुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
advertisement
विमान अपघातात कुणा-कुणाचा मृत्यू झाला?
खासगी VSR कंपनीचे विमान
एकूण प्रवासी 05
1. माननीय अजित दादा पवार साहेब
2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव
3. पायलट कॅप्टन सुमित कपूर
4. कॅप्टन संभवी पाठक
5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 11:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू, सुप्रिया सुळेंची एका शब्दात प्रतिक्रिया, स्टेटसमध्ये म्हणाल्या...










