Maharashtra Loksabha Election Result : अमरावतीतून नवनीत राणांना मोठा धक्का, बच्चू कडूंचा गेम यशस्वी?

Last Updated:

लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे, अमरावतीमधून मोठी बातमी समोर आली आहे, भाजप उमेदवार नवनीत राणा या पिछाडीवर आहेत.

News18
News18
अमरावती, प्रतिनिधी : अमरावतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे. नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून पिछाडीवर आहेत, तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी आघाडी घेतली आहे. नवनीत राणा यांना यावेळी महायुतीकडून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. मात्र त्यांच्या उमेदवारीला महायुतीमधीलच अनेक नेत्यांचा विरोध होता. बच्चू कडू यांनी देखील नवनीत राणा यांच्या उमेदवारीच्या विरोधात भूमिका घेतली. त्याचा फटका हा राणा यांना बसणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हाती आलेलेल्या मतमोजणीनुसार सध्या तरी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे हे आघाडीवर आहेत. तर भाजप उमेदवार नवनीत राणा या पिछाडीवर आहेत. आपन विजयी होऊ असा दावा नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र सध्या त्यांना धक्का बसताना दिसत आहे.
दरम्यान  जवळपास अडीच महिन्यांच्या राजकीय रणधुमाळीनंतर लोकसभेच्या महाभारताचा आज फैसला होणार आहे. देशातील 543 लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे, भाजपने यावेळी ‘अब की बार 400 पार’चा नारा दिला आहे. पण एक्झिट पोलमध्ये एनडीएला 350 ते 380 पर्यंत जागांचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे भाजप खरंच 400 पार करेल का हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने विरोधी पक्षांची मोट बांधत इंडिया आघाडीने लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे काँग्रेस यावेळी मोदींचा रथ रोखणार का, लोक इंडिया आघाडीला स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
Maharashtra Loksabha Election Result : अमरावतीतून नवनीत राणांना मोठा धक्का, बच्चू कडूंचा गेम यशस्वी?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement