ग्राहकांना मिळणार 300 युनिट मोफत वीज, अनुदानही मिळणार, नेमकी काय आहे यासाठीची प्रक्रिया?

Last Updated:

नागरिकांनी नॅशनल पोर्टल या साइटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने किती वॅटचा प्रकल्प घ्यायचा आहे, या माहितीसह हा अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर पुढची प्रक्रिया ही महावितरणतर्फे होईल.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : केंद्र शासनाकडून नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत असतात. त्यामधील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री सूर्य घर मोफत बिजली योजना. ही योजना केंद्र सरकारकडून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना 300 व्हॅट वीज मोफत देण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी काही अटी आणि नियम लागू आहेत. त्यामुळे या अटी आणि नियम नेमक्या कोणत्या आहे, याबाबत लोकल18 च्या टीमने विशेष आढावा घेतला.
advertisement
अनुदानही मिळणार -
केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सूर्यघर मोफत बिजली या योजने अंतर्गत नागरिकांना 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. यासाठी केवळ जे अर्ज करणारे आहेत, अशा नागरिकांचे घर हे आरसीसीचे असायला हवे. या उपक्रमांतर्गत एक किलो, दोन किलो आणि तीन किलो वॅट या सिस्टीमने अनुदान हे दिले जाणार आहे.
जाहिरात क्षेत्रातील मोठी नोकरी सोडली अन् घेतला वडापाव विकण्याचा निर्णय, कल्याणच्या तरुणाची अनोखी गोष्ट!
तर नागरिकांनी नॅशनल पोर्टल या साइटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने किती वॅटचा प्रकल्प घ्यायचा आहे, या माहितीसह हा अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर पुढची प्रक्रिया ही महावितरणतर्फे होईल. शहरातील अनेक नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत आणि नागरिकांना प्रकल्प बसवून दिला आहे, अशी माहिती महावितरण तर्फे देण्यात आली आहे.
advertisement
किती अनुदान मिळणार -
या प्रकल्पासाठी कोणत्याही वर्गातील नागरिक हे अर्ज करू शकतात. यासाठी नॅशनल पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज हा करावा लागेल. प्रकल्प बसवण्यात आलेल्या प्लेटची 10 ते 15 दिवसातून एकदा स्वच्छता करावी लागेल. यासाठी शासनाकडून अनुदानही मिळत आहे. एक किलो वॅटसाठी तीस हजार रुपये, दोन किलो वॅटसाठी 60 हजार रुपये आणि तीन किलो वॅटसाठी 67 हजार रुपये इतके अनुदान मिळणार आहे. तसेच जर तुम्हाला तीन किलो वॅटपेक्षा जास्त प्रकल्प घ्यायचा असेल तर त्याला 78 हजार रुपये इतके अनुदान मिळणार आहे.
advertisement
महावितरणने केले हे आवाहन -
यासाठी तुमचे घर हे आरसीसीचे असायला हवे. हा प्रकल्प बसल्यानंतर दोन मीटर बसविण्यात येणार आहेत. यामुळे, एका मीटरवरून तुमचा किती वापर आहे, हे समजणार आहे आणि दुसऱ्या मीटरद्वारे महावितरण कंपनीने किती पुरवठा केला आहे, ही माहिती ग्राहकांना समजणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
ग्राहकांना मिळणार 300 युनिट मोफत वीज, अनुदानही मिळणार, नेमकी काय आहे यासाठीची प्रक्रिया?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement