भाजप 150+ जागांवर लढणार, मग अॅडजस्ट कोण करणार? अमित शाहांसोबतच्या बैठकीला दादा-भाई उपस्थित
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Seat Sharing Meeting: महायुतीच्या जागा वाटपासंबंधीच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती आहे.
राहुल झोरी, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी रात्री महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज १८ लोकमतला दिली आहे. महायुतीच्या ह्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती आहे.
भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीत १५२ - १५५ जागा लढवण्यावर ठाम आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील १०० जागांवर दावा केला आहे. भाजप १५५ जागांवरच ठाम राहिल्यास उर्वरित १३३ जागा ह्या शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाटून घ्यायच्या झाल्यास जागावाटपाच्या गणितात कमी जागांवर दोन पावलं मागे कोण जाणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
advertisement
रोहित पवारांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा जाणार नाही, कारण...
आज मंगळवारी रात्री होणाऱ्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्तिच करत पितृपक्ष संपताच १०० जागा जाहीर करण्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा भर आहे. कारण काही जागा जाहीर करून उमेदवारांना मतदारसंघात प्रचार सुरू करता येईल, असे नियोजन आहे. त्यामुळे आता शाह आणि फडणवीसांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत राज्यातली आकड्यांची गणिते कशी जुळवली जातायेत हे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठक, समीकरणांची जुळवाजुळव
-केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक
-भाजपकडून राज्य निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची उपस्थिती
-शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती
advertisement
-राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल संभाजीनगर येथे बैठकीसाठी दाखल
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 24, 2024 10:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
भाजप 150+ जागांवर लढणार, मग अॅडजस्ट कोण करणार? अमित शाहांसोबतच्या बैठकीला दादा-भाई उपस्थित


