छातीवर गोळ्या जरी चालवल्या तरी माघार नाही, बच्चू कडूंचा निर्धार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
शेतीत मेल्यापेक्षा आम्ही आंदोलनात गोळ्या खाऊन मरू, मात्र आता माघार नाही, असा निर्धार बच्चू कडू यांनी केला आहे.
वर्धा : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत निघालेला बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर मोर्चा मोझरीवरुन वर्धा येथे पोहचला आहे. आंदोलनात गोळ्या खाऊ पण आता माघार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली .उद्या प्रचंड संख्येनं शेतकरी बाहेर निघेल आणि प्रत्येक घरातला एक शेतकरी जरी बाहेर आला तर सरकार झुकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
आम्ही आंदोलनात गोळ्या खाऊन मरू : बच्चू कडू
बच्चू कडू म्हणाले, चार महिने झाले मात्र कर्जमाफीवर काही निर्णय झालेला नाही आहे. अजूनही शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केलेलं नाही. सोयाबीन 1800 ते 2000 रुपयांनी विकाव लागत आहे. पंजाबच्या सगळ्या शेतकऱ्यांच पीक खरेदी केला जातो 90% पीक खरेदी हमीभावाने होते आमचे येथे सहा टक्के देखील खरेदी होत नाही. नैसर्गिक आपत्तीपेक्षा कमी भावाने शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकावा लागतो त्यामुळे आत्महत्या करायची वेळ येत आहे. शेतीत मेल्यापेक्षा आम्ही आंदोलनात गोळ्या खाऊन मरू, मात्र आता माघार नाही.
advertisement
शेतकऱ्यांचं काहीही चुकलं नाही : बच्चू कडू
शेतकऱ्यांना हा त्रास दिला जात असेल तर शेतकरी करणार तरी काय म्हणून संतापाच्या भरात शेतकऱ्यांनी तहसीलदाराच्या गाडीवर हल्ला केला असेल तर यात शेतकऱ्यांचं काहीही चुकलं नाही असे देखील बच्चू कडू या वेळी म्हणाले.
राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणी, बच्चू कडू म्हणाले...
कार्यालयात लावणीचा कार्यक्रम हा त्यांचा प्रश्न आहे. पण तो एखाद्या पार्टीच्या कार्यालयात असावा नसावं हे त्या पक्षांना ठरवलं पाहिजे. एकीकडे शेतकरी मरत असताना तुम्ही जर कार्यालयात लावणी लावत असाल तर चुकीचा आहे.
view commentsLocation :
Wardha,Maharashtra
First Published :
October 27, 2025 9:25 PM IST


