Diwali 2024 : बंजारा समाजाची आगळी वेगळी दिवाळी, 5 हजार वर्षांची परंपरा आजही तग धरून

Last Updated:

दिवाळी सणाचे विशेष महत्त्व असणाऱ्या बंजारा समाजाच्या परंपरेत अविवाहित मुली हातात पणती घेऊन ‘मेरा गीत’ म्हणतात आणि कुटुंबातील सदस्यांसाठी प्रार्थना करतात.

+
 बंजारा

 बंजारा समाजाची पारंपारिक दिवाळी 

प्रशांत पवार-प्रतिनीधी, बीड : दिवाळी सण भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे, आणि विविधतेने नटलेल्या आपल्या देशात प्रत्येक समाज दिवाळीचे खास प्रकारे स्वागत करतो. बंजारा समाजात ही दिवाळी वेगळीच उत्सवभावनेत आणि अनोख्या परंपरेत साजरी केली जाते. विशेषतः या सणात अविवाहित मुलींना लक्ष्मीचा दर्जा देऊन घराघरात पूजा करण्याची रीत आहे.
बंजारा समाजातील मुली दिवाळीच्या संध्याकाळी घराघरात जातात, त्यांच्या हातात पणती घेऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्य व समृद्धीसाठी प्रार्थना करतात. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांसाठी त्या एक खास गाणं गायन करतात:
"वर्षे दनेरी कोड दवाळी याडी तोन मेरा वर्षे दनेरी कोड दवाळी बापू तोन मेरा वर्षे दनेरी कोड दवाळी भिया तोण मेरा..."
या गीताच्या माध्यमातून त्या देवाला प्रार्थना करतात की कुटुंबावर कोणतेही संकट येऊ नये आणि प्रत्येक सदस्याला उत्तम आरोग्य लाभावे. मुलींच्या हातातल्या पणतीमध्ये धनधान्याचा आशिर्वाद मानला जातो, आणि त्या कुटुंबीयांना स्वतःच्या आशीर्वादात सामील करतात. प्रत्येक कुटुंबीय याबद्दल दान म्हणून काही पैसे देऊन या आशीर्वादाचा मान राखतो.
advertisement
बंजारा समाजात एक विशेष "गोधन पूजा" देखील केली जाते. या पूजेत अविवाहित मुली वेगवेगळ्या वनस्पती, फुले गोळा करून, त्यातून दिवाळीसाठी विशिष्ट पूजेची तयारी करतात. गोधन पूजेचा उद्देश म्हणजे गायीचे शेण आणि त्याचे पर्यावरणातले महत्त्व अधोरेखित करणे. हे शेण धरतीला समृद्ध करते, अशी श्रद्धा आहे, ज्याचा पाया जवळपास पाच हजार वर्षांपूर्वी रोवला गेला आहे. बंजारा समाजाच्या मते, शेण आणि गोमाता ही केवळ उपयुक्त नव्हे तर पूजनीय देखील आहे, म्हणूनच या पूजेच्या माध्यमातून गोधनाचे महत्त्व लोकांना समजावले जाते.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Diwali 2024 : बंजारा समाजाची आगळी वेगळी दिवाळी, 5 हजार वर्षांची परंपरा आजही तग धरून
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement