Beed Santosh Deshmukh Case : आमदाराला एक बॉडिगार्ड, आरोपीला दोन बॉडिगार्ड, वाल्मिक कराडचा मुद्दा विधानसभेत

Last Updated:

Beed Sarpanch Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला.


आमदाराला एक बॉडिगार्ड, आरोपीला दोन बॉडिगार्ड, वाल्मिक कराडचा मुद्दा विधानसभेत
आमदाराला एक बॉडिगार्ड, आरोपीला दोन बॉडिगार्ड, वाल्मिक कराडचा मुद्दा विधानसभेत
नागपूर :  बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आमदारांच्या सुरक्षितेसाठी फक्त एक सुरक्षा रक्षक मिळतो. पण, आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला दोन-दोन सुरक्षा रक्षक कसे मिळतात असा मुद्दा उपस्थित केला.
परभणी आणि बीडमधील प्रकरणावर विरोधकांकडून आज सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी औचित्याच्या मुद्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आवाज उठवला. तर, दुसरीकडे बीड जिल्ह्यातील केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी देखील हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत दोषींच्या फाशीची शिक्षेची मागणी केली. सभागृहाबाहेर विरोधकांनी आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले.
advertisement
आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटले की, आमच्या बीड जिल्ह्यात भयानक गोष्ट झाली आहे. संतोष देशमुख या सरपंचाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. पण अजून त्याच्या मागचा मास्टरमाईंड सापडलेला आहे. याबाबत मी वारंवार तक्रार करतोय, त्याचं नाव वाल्मिक कराड आहे.

मास्टरमाईंड शोधा...बीडमध्ये मोर्चाचा इशारा...

आमदार म्हणून आपल्याला एक बॉडिगार्ड मिळतो आणि या क्रिमिनल माणसाला दोन दोन बॉडीगार्ड कसे मिळतात, असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला. या आरोपीला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आत टाकलंय. पण 302 मध्ये कट रचलेला होता त्याच्यामध्ये या वाल्मिक कराडचा नाव नाही आहे. हत्या केलेल्या आरोपीचे कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडे कॉल रेकॉर्ड जर सापडले तर या खुनाचा उलगडा होईल, असेही क्षीरसागर यांनी म्हटले. अधिवेशना संपण्याआधी जर वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर मोठा मोर्चा बीडमध्ये काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
advertisement

आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी...

भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. संतोष देशमुख माझ्याच मतदारसंघातील होते. सरपंच म्हणून त्यांनी चांगले काम होते.  त्यांचे राष्ट्रीय महामार्गावर अपहरण करण्यात आलं. अवघ्या दोन तीन तासात त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकण्यात आल्याचे मुंदडा यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed Santosh Deshmukh Case : आमदाराला एक बॉडिगार्ड, आरोपीला दोन बॉडिगार्ड, वाल्मिक कराडचा मुद्दा विधानसभेत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement