अपहरणाचा प्रयत्न, विद्यार्थिनीने कंपासमधल्या कर्कटकने हल्ला चढवला, रिक्षाचालक खाली पडला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
विद्यार्थिनीने स्कूल बॅगमधील कंपास पेटीमध्ये असलेल्या कर्कटकने रिक्षावाल्यास मारून, शेजारील बसलेल्या त्याच्या साथीदारास धक्का मारून रिक्षातुन उडी मारून स्वतःची सुटका करून घेतली.
भिवंडी : सर्वत्र महिलांसह अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना भिवंडीत रिक्षा चालकाने आपल्या साथीदाराच्या सोबतीने शाळकरी विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थिनीने धाडसाने रिक्षा चालकावर हल्ला चढवून स्वतःची सुटका करून घेण्यात यशस्वी झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील फातिमा नगर परिसरात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन तरुणी बुधवार ९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता शाळेत जाण्यासाठी रिक्षाने निघाली होती. तिची रिक्षा रामनगर येथील पाण्याच्या टाकी जवळील शाळेजवळ आली असता विद्यार्थिनीने रिक्षा थांबविण्यास सांगितली. मात्र रिक्षा चालकाने रिक्षा न थांबविता पुढील बाजूस नेऊन मुलीस जबदरस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
advertisement
त्यावेळी प्रसंगावधान राखत विद्यार्थिनीने स्कूल बॅगमधील कंपास पेटीमध्ये असलेल्या कर्कटकने रिक्षावाल्यास मारून, शेजारील बसलेल्या त्याच्या साथीदारास धक्का मारून रिक्षातुन उडी मारून स्वतःची सुटका करून घेत विद्यार्थिनी शाळेत पोहचली. घरी आल्यावर तिने आपल्या सोबत घडलेला प्रसंग आई वडिलांना सांगितली.
त्यानंतर शुक्रवारी विद्यार्थिनेच्या तक्रारीनंतर अज्ञात रिक्षाचालक आणि त्याचा साथीदार अशा दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 137(2), 62 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस विद्यार्थिनीने दिलेल्या वर्णनावरून रिक्षा चालकाचा शोध सुरू केला आहे, अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.
view commentsLocation :
Bhiwandi Nizampur,Thane,Maharashtra
First Published :
July 13, 2025 9:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अपहरणाचा प्रयत्न, विद्यार्थिनीने कंपासमधल्या कर्कटकने हल्ला चढवला, रिक्षाचालक खाली पडला


