भाजपच्या बैठकीत मोठी घडामोड, ठाणे-कोकणासाठी वेगळा प्लॅन, एकनाथ शिंदे होणार चेकमेट?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागताच महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येताना दिसत आहे. आगामी निवडणुकीच्या भाजपकडून 'एकला चलो'चा नारा देण्यात येत आहे.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागताच महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येताना दिसत आहे. आगामी निवडणुकीच्या भाजपकडून 'एकला चलो'चा नारा देण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपने मराठवाड्यात स्वबळावर निवडणूक लढावी, असा सूर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा दिसून आला होता. आता असंच चित्र ठाणे आणि कोकण विभागात देखील दिसून येत आहे.
ठाणे-कोकण विभागाच्या बैठकीत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी स्वबळाचाच नारा दिला आहे. महायुती म्हणून तीन पक्षांनी निवडणूक लढवायला नको. भाजप म्हणूनच स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरू, असा नारा या बैठकीत देण्यात आला. भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील अशी मागणी केली.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघरसह ठाण्यातही भाजपने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणात भाजपची कामगिरी सर्वात जास्त चांगली होती. याच पार्श्वभुमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजप स्वबळावर लढली तर सर्वात जास्त जास्त यश मिळेल, असा अंदाज भाजपला आहे.
advertisement
पण ठाणे-नवी मुंबईतही भाजप स्वबळावर लढलं तर हा थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान असणार आहे. त्यामुळे भाजप महायुती म्हणून लढणार की स्वबळाचा नारा देणार, याबाबत पेच निर्माण झाला आहे. स्वबळावर लढण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेतला जाईल. मात्र मित्रपक्षांसोबत टोकाचा वाद टाळण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदार - पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
October 12, 2025 7:23 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपच्या बैठकीत मोठी घडामोड, ठाणे-कोकणासाठी वेगळा प्लॅन, एकनाथ शिंदे होणार चेकमेट?