BJP On Local Body Election : ठाकरेच नाही तर शिंदेंनाही घेरण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन, मुंबईसह कोकणात शतप्रतिशत कमळ फुलणार?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Local Body Election : भाजपकडून आता फक्त ठाकरेच नाही तर शिंदे गटालाही धोबीपछाड देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली असून सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदांपासून ते महापालिका निवडणुका होणार असल्याने मिनी विधानसभा निवडणुकीचे चित्र आहे. युती-आघाडीच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे काही पक्षांमध्ये स्वबळाचा नारा पक्षात दिला जात आहे. भाजपनेही स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. भाजपने आता फक्त ठाकरेच नाही तर शिंदे गटालाही धोबीपछाड देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईसह कोकणातही शतप्रतिशत भाजप सत्तेवर आणण्यासाठी रणनीती सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे.
advertisement
भाजपच्या ठाणे-कोकण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी स्वबळाचाच नारा दिला आहे. महायुती म्हणून तीन पक्षांनी निवडणूक लढवायला नको. भाजप म्हणूनच स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरू, अशी भूमिका स्थानिक भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे मांडली आहे.
advertisement
या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीचे सर्व अधिकार हे जिल्ह्यांना देण्यात आले आहेत. जिथे जिथे युती शक्य आहे तिथे युती मैत्रीत कुटेही कटुता येऊ नये असे ही आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहे. एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी टोकाची टीका आणि कटुता येऊ नये, याची काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
advertisement
ठाकरेंसह आता शिंदे गटाचाही गेम होणार?
भाजपने मागील काही वर्षात राज्यात आपले बळ वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्याच्या सत्ताकारणात आपलंच नाणं खणखणीत वाजत असल्याचे दाखवण्यासाठी भाजप नेतृत्त्वाचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीमध्ये कुरघोडीच्या राजकारणाची चर्चा सुरू असताना ठाण्यातच भाजपने शिवसेना शिंदे गटाचे मु्ख्य नेते एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न केले. आमदार संजय केळकर यांच्यासह गणेश नाईक यांना देखील बळ देण्यात आले. ठाणे महापालिकेत भाजपचा महापौर बसवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजपच्या काही नेत्यांनी म्हटले.
advertisement
मुंबईतही ठाकरेंना धक्का देताना एकनाथ शिंदेंनाही धक्का देण्याची तयारी भाजपने केली आहे. मुंबई भाजप शिंदेगट महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबई आणि वसई-विरारमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
advertisement
रायगडमध्ये शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होईल. मात्र, भाजपने आपले पत्ते अजून तरी पूर्ण जाहीर केले नाहीत. त्यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादीसोबत भाजपने युती केल्यास शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात ठाकरे गटासह शिंदे गटावरही भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवून कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू शकतो.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2025 12:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP On Local Body Election : ठाकरेच नाही तर शिंदेंनाही घेरण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन, मुंबईसह कोकणात शतप्रतिशत कमळ फुलणार?