BMC Election: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा, भाजपने डाव टाकला, आमदार-नगरसेवकांना कामाला लावले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
BJP Mumbai: मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळवण्याच्या दृष्टीने वॉर्डनिहाय आढावा घेऊन अहवाल सादर करण्याकरिता पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
मुंबई: हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळवण्याच्या दृष्टीने वॉर्डनिहाय आढावा घेऊन अहवाल सादर करण्याकरिता पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. येत्या काही महिन्यात महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. विभागनिहाय पदाधिकाऱ्यांची यादी मुंबई भाजपाध्यक्ष, मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केली.
आमदार-नगरसेवकांना आठवडाभरात अहवाल द्यावा लागणार
या सदस्यांना 7 जुलै 2025 पर्यत भाजप मुंबई कार्यालयात अहवाल सादर करावा लागणार आहे. आढावा घेण्यासाठी उतर मुंबई जिल्हाची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर आणि आमदार योगेश सागर यांच्याकडे देण्यात आली आहे. तर उत्तर पश्चिम जिल्ह्याचा आढावा आमदार अमीत साटम आणि आमदार विद्या ठाकृर घेणार आहेत.
advertisement
उत्तर पूर्व जिल्हाचा आढावा आमदार मिहिर कोटेचा आणि माजी खासदार मनोज कोटक हे दोघे घेणार असून उत्तर मध्य जिल्ह्याची जबाबदारी पराग अळवणी आणि संजय उपाध्याय यांच्याकडे देण्यात आली आहे. दक्षिण मध्य जिल्ह्याचा आढावा प्रसाद लाड आणि माजी आमदार सुनिल राणे तर दक्षिण मुंबई जिल्ह्याचा आढावा मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत.
advertisement
दरम्यान, आज निवडणूक संचलन समितीची ही घोषणा करण्यात आली असून एकूण 27 सदस्यांच्या या समितीमध्ये मुंबईतील आजी माजी आमदार, माजी नगरसेवक आणि महिला, युवा मोर्चा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले.
राज ठाकरे-उद्धव ठाकरे १८ वर्षांनंतर प्रथमच एकत्र दिसणार
महाराष्ट्रातील शाळांत पहिलीपासून हिंदी शिकविण्याच्या धोरणास विरोध म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मोर्चाची घोषणा केली आहे. सुरुवातीला दोन मोर्चे निघणार होते. परंतु राज ठाकरे यांच्या विनंतीनुसार एकच मोर्चा काढून मराठी माणसांची ताकद सरकारला दाखवून देण्याचा मानस दोन्ही पक्षांचा आहे. येत्या ५ जुलै रोजी मुंबईत कोणत्याही झेंड्याशिवाय आणि अजेंड्याशिवाय केवळ मराठीचा पुरस्कार करण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात तब्बल १८ वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र रस्त्यावर उतरलेले दिसून येतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 28, 2025 7:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा, भाजपने डाव टाकला, आमदार-नगरसेवकांना कामाला लावले