मुंबईतील शिंदेसेनेचे उमेदवार हाजी सलीम कुरेशी यांच्यावर हल्ला, पोटात चाकू खुपसला

Last Updated:

मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सलीम कुरेशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे.

शिवसेना उमेदवारावर हल्ला
शिवसेना उमेदवारावर हल्ला
मुंबई : यंदा महानगरपालिकांच्या निवडणुकीला गालबोट लागले असून राज्यातील बऱ्याच ठिकाणी उमेदवारांवर हल्ले होतायेत. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सलीम कुरेशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. हल्लेखोराने त्यांच्या पोटात चाकू खुपसला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईच्या वांद्र्यातील ज्ञानेश्वर नगर येथे प्रचार करायला गेले असताना अज्ञाताने त्यांच्यावर चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांना गंभीर इजा झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.  हाजी सलीम कुरेशी यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्लेखोरांची नावे अद्याप समोर येऊ शकलेली नाहीत. तसेच हल्ल्याचे कारणही अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी हल्लेखोरांच्या मागावर पथके पाठवली आहे. तसेच गुन्हा दाखल करण्याचे कामही सुरू असल्याचे कळते.
advertisement

राज्यभरात उमेदवारांवर हल्ले होण्याच्या अनेक घटना

मुंबई आणि राज्यातही उमेदवारांवर हल्ले होण्याचे प्रकार समोर येऊ लागलेले आहेत. उमेदवारांवर दबाव टाकून प्रतिस्पर्धी पक्षाचे लोक दबावाचे राजकारण करीत आहेत. यासंबंधाने अनेक व्हिडीओ देखील व्हायरल झाले. या घटनांवरून नव्या जमान्याच्या राजकारणाला 'रक्ताचा डाग' लागल्याचे म्हणावे लागेल.

कोण आहे हाजी सलीम कुरेशी?

हाजी सलीम कुरेशी हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत
advertisement
पूर्वी ते एमआयएम या पक्षात कार्यरत होते
मुंबई महापालिका निवडणूक लढविण्यासाठी ते शिवसेना पक्षात आले
एकनाथ शिंदे यांनीही त्यांना उमेदवारी दिली
मुंबईतील प्रभाग क्रमांक ९२ मधून ते निवडणूक लढवत आहेत
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईतील शिंदेसेनेचे उमेदवार हाजी सलीम कुरेशी यांच्यावर हल्ला, पोटात चाकू खुपसला
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement