2400 कोटींची डील अन् आलिया भट्टने शेअर केला देवेंद्र फडणवीसांचा फोटो, नेमकं कारण काय?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
अभिनेत्री आलिया भट्टने मंगळवारी तिच्या इन्स्टा अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो होता. तिने हा फोटो शेअर करताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले.
मुंबई: महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहेत. राज्यातील वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अवघ्या काही दिवसांवर ठेपलेल्या या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या स्टोरीवर एक फोटो टाकला आणि या नाट्यात आणखीनच भर पडली आहे.
अभिनेत्री आलिया भट्टने मंगळवारी तिच्या इन्स्टा अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो होता. तिने हा फोटो शेअर करताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. काहींनी तर्क लावला की हा महाराष्ट्रातील निवडणुकांशी संबंधित आहे का? तर, काहींनी म्हटलंय की हे एखाद्या मोठ्या बॉलिवूड डीलशी संबंधित असू शकतं. दरम्यान, आता या प्रकरणावरून पडदा पडला असून याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केलेली एक पोस्ट समोर आली आहे.
advertisement
आलिया भट्टच्या इन्स्टा स्टोरीचा अर्थ काय?
'एक्सेल एन्टरटेन्मेंट' ही बॉलिवूडमधील मोठी म्युझिक कंपनी असून 'दिल चाहता है', 'डॉन' किंवा 'मिर्झापूर' यांसारख्या अनेक फिल्म आणि सीरिज त्यांनी प्रोड्यूस केल्या आहेत. आता याच एक्सेलने जागतिक स्तरावर आपला डंका वाजवण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. जगातील सर्वात मोठी म्युझिक कंपनी असलेल्या 'युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप'ने (UMG) एक्सेल एन्टरटेन्मेंटमध्ये ३० टक्के भागीदारी विकत घेतली असून, या व्यवहारामुळे एक्सेलचं बाजारमूल्य तब्बल २,४०० कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
advertisement
सोमवारी मुंबईत एका शाही सोहळ्यात या कराराची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी होती. या करारानुसार, युनिव्हर्सल म्युझिक इंडिया आता एक्सेलच्या केवळ म्युझिकमध्येच नाही, तर चित्रपट, वेब सीरिज आणि इतर सर्व नवीन फॉरमॅट्समध्ये धोरणात्मक भागीदार असणार आहे.
advertisement
A landmark ₹2400 crore announcement of investment in Mumbai reshaping Indian Entertainment industry!
🔸 CM Devendra Fadnavis witnesses strategic partnership deal announcement between Universal Music Group and Excel Entertainment.
Veteran Lyricist, Poet and Screenwriter Javed… pic.twitter.com/HDn7StQWWB
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 5, 2026
advertisement
या भागीदारीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, यापुढे एक्सेलच्या प्रत्येक प्रोजेक्टचं संगीत जागतिक स्तरावर युनिव्हर्सल म्युझिकद्वारे पोहोचवलं जाईल. इतकंच नाही, तर दोन्ही कंपन्या मिळून एक 'एक्सेल म्युझिक लेबल' सुद्धा सुरू करणार आहेत.

याच गोष्टीचा आनंद व्यक्त करत आलियाने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने फरहान अख्तरचे कौतुक करत लिहिले 'तुमची अधिकाधिक प्रगती होवो...'
advertisement
१९९९ मध्ये दोन मित्रांनी मिळून केली होती एक्सेलची स्थापना
१९९९ मध्ये रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी एक्सेलची स्थापना केली होती. आज २५ वर्षांनंतर त्यांनी जागतिक बाजारपेठेत झेप घेतली आहे. या करारामुळे युनिव्हर्सल म्युझिकच्या इंटरनॅशनल आर्टिस्ट्सना भारतीय चित्रपटांत काम करण्याची संधी मिळेल, तर भारतीय गायकांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध होईल. 'युनिव्हर्सल म्युझिक पब्लिशिंग ग्रुप' आता एक्सेलचा एक्सक्लुझिव्ह पब्लिशिंग पार्टनर असेल.
advertisement
दिग्गजांची उपस्थिती
या ऐतिहासिक सोहळ्याला ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, फरहान अख्तर, रितेश सिधवानी यांच्यासह युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे ॲडम ग्रॅनाइट आणि देवराज सन्याल उपस्थित होते. भारताची 'कंटेंट इकॉनॉमी' सध्या वेगाने वाढत आहे, आणि अशा वेळी हा आंतरराष्ट्रीय करार भारतीय मनोरंजनाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 5:53 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
2400 कोटींची डील अन् आलिया भट्टने शेअर केला देवेंद्र फडणवीसांचा फोटो, नेमकं कारण काय?











