दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, बुलडाण्यात अंत्यसंस्कार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आई वडिलांचे अपार कष्ट आणि शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या दीपक बनसोडे यांना वीरमरण आल्याने गावात शोककळा पसरली आहे.
बुलडाणा, प्रतिनिधी राहुल खंदारे : दहशतवाद्यांना प्रत्युत्त देताना महाराष्ट्राच्या वीरपुत्राला वीरमरण आलं आहे. जवान दीपक बनसोडे यांना दहशतवादी कारवाईला प्रत्युत्तर देत असताना वीरमरण आलं. त्यांचं पार्थिव आज बुलडाण्यात दाखल होणार आहे.
बुलडाणा तालुक्यातील पळसखेड नागो येथील रहवासी सैनिक दीपक दिवाकर बनसोडे यांना आतंकवादी हल्ल्यात प्रत्युत्तर देत असतांना वीरमरण आले जम्मू काश्मीर येथे हेडकॉटर RR या ठिकाणी शहीद झाले. त्यामुळे पळसखेड नागो गावावर शोककळा पसरली आहे.
नागो बुलडाण्यापासून 12 किलोमीटर अंतरावर दिवाकर बनसोडे यांचं गाव आहे. भूमिहीन दिवाकर बनसोडे यांनी मोलमजुरी करुन तीन मुलं आणि एका मुलीला मोठं केलं. दुसरा मुलगा 2019 रोजी सैन्यदलात भरती झाला होता. गेल्या वर्षी दीपक याचं लग्न झालं होतं. त्यांची पत्नी अश्विनी मुंबई पोलीस दलात कर्तव्य बजावत आहे.
advertisement
आई वडिलांचे अपार कष्ट आणि शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या दीपक बनसोडे यांना वीरमरण आल्याने गावात शोककळा पसरली आहे. दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आलं. 23 सप्टेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास त्यांचं पार्थिव मुंबईत आलं. तिथून 24 सप्टेंबर रोजी बुलडाणा जिल्हा रुग्णालात हलवण्यात आलं. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्चात आई वडील पत्नी दोन भाऊ बहीण असा परिवार आहे.
Location :
Buldana (Buldhana),Buldana,Maharashtra
First Published :
September 25, 2024 11:01 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, बुलडाण्यात अंत्यसंस्कार