‘शुक्रिया मोदीजी’! महाराष्ट्राच्या या जिल्ह्यातून शेकडो मुस्लिम महिलांनी का पाठवली पंतप्रधानांना पत्र?
- Published by:Priya Lad
Last Updated:
मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे मुस्लिम महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मुस्लिम समाजाच्या शेकडो महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत.
राहुल खंडारे, प्रतिनिधी/बुलडाणा : आज महिला दिन. या दिवशी शेकडो मुस्लिम महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवलं आहे. या सर्व महिलांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. या सर्व महिला आहेत महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यातील. त्यांनी मोदींचे आभार का मानले, मोदींना पत्र का दिलं, या पत्रात त्यांनी आणखी काय लिहिलं होतं पाहुयात.
मुस्लिम समाजाच्या शेकडो महिलांनी बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शुक्रिया मोदीजी अशा आशयाची पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी चिखली शहर आणि तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मोदी सरकारने तिहेरी तलाकसंदर्भात आणलेल्या कायद्यामुळे मुस्लिम महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तसंच केंद्राच्या आणि राज्याच्या विविध योजनांचा महिलांना मोठा फायदा होत असल्याचं या महिलांनी सांगितलं.
advertisement
22 ऑगस्ट 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने तिहेरी तलाक असंवैधानिक घोषित केला. 22 ऑगस्ट 2017 च्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला 6 महिन्यांत कायदा करण्यास सांगितले. सरकारने याबाबतचं विधेयक आणलं. 15 डिसेंबर 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली. 29 डिसेंबर 2017 रोजी सरकारने हे विधेयक संसदेत मांडलं. हे विधेयक 25 जुलै 2019 रोजी लोकसभेने आणि 30 जुलै 2019 रोजी राज्यसभेने मंजूर केलं. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर तो कायदा झाला.
advertisement
केंद्र सरकारने एक ऑगस्ट 2019 रोजी देशात तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा लागू केला होता. या कायद्यामुळे तिहेरी तलाक ही सामाजिक कुप्रथा आता फौजदारी गुन्हा समजला जातो. हा कायदा लागू झाल्यापासून देशात, तिहेरी तलाक च्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
शिक्षा किती?
या कायद्यानंतर कोणताही मुस्लिम आपल्या पत्नीला तिहेरी तलाक देऊन संबंध संपवू शकत नाही. असं केल्याने पोलीस वॉरंटशिवाय अटक करून तुरुंगात पाठवू शकतात. तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात.
advertisement
या मुस्लिम देशांमध्ये तिहेरी तलाकवर बंदी आहे
पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त, ट्युनिशिया, मोरोक्को, इंडोनेशिया, इराण, अफगाणिस्तान, तुर्की, श्रीलंका, ब्रुनेई, सीरिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, सायप्रस, जॉर्डन यासह इतर अनेक देशांमध्ये तिहेरी तलाकवर बंदी घालण्यात आली आहे
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
Mar 08, 2024 1:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
‘शुक्रिया मोदीजी’! महाराष्ट्राच्या या जिल्ह्यातून शेकडो मुस्लिम महिलांनी का पाठवली पंतप्रधानांना पत्र?









