Bhagyashree Navtake : IPS भाग्यश्री नवटाके अडचणीत, CBIने दाखल केला गुन्हा
- Published by:Suraj
Last Updated:
भाग्यश्री नवटाके आर्थिक गुन्हे शाखेच्या डीसीपी म्हणून कार्यरत असताना जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी राज्य सहकारी पतसंस्थेत १२०० कोटींचा घोटाळा झाला होता.
मुंबई : जळगावमधील बीएचआर राज्य सहकारी पथसंस्थेच्या घोटाळा प्रकरणाच्या तपासात अनियमितता असल्याच्या आरोपावरून आयपीएस भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. भाग्यश्री नवटाके आर्थिक गुन्हे शाखेच्या डीसीपी म्हणून कार्यरत असताना जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी राज्य सहकारी पतसंस्थेत १२०० कोटींचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याचा तपास भाग्यश्री नवटाके यांनी केला होता. या तपासात अनियमितता असल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत.
आयपीएस भाग्यश्री नवटाके यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने ऑगस्ट 2024 मध्ये या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. सीबीआयने आता याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.
गुन्हे शाखेकडून बीएचआर घोटाळ्याशी संबंधित तपासाची चौकशी करण्यात आली. सीआयडीने राज्याच्या गृहविभागाला यासंदर्भात अहवालही सोपवला. या अहवालानुसार पुणे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिले होते. भाग्यश्री नवटाके यांनी बीएचआर घोटाळा प्रकरणाचा तपास केला होता. या तपासात अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या.
advertisement
आयपीएस भाग्यश्री नवटाके या सध्या चंद्रपूरमध्ये राज्य राखीव पोलीस दलात अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. २०१५ मध्ये बीएचआर घोटाळा झाला होता. या घोटाळ्यात फिक्स डिपॉझिटवर आकर्षक व्याजाचं आश्वासन देण्यात आलं होतं. यानंतर बँकेकडून ग्राहकांची फसवणूक करण्यात आली होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2024 12:13 PM IST


