Dombivli Crime: अचानक गाडीवर येतात अन्... डोंबिवलीकरांनी रस्त्याने चालण्याचा घेतला धसका! कारण काय?

Last Updated:

Dombivli Crime: एका आंतरराज्य टोळीला कल्याण-डोंबिवली पोलिसांनी जेरबंद केलं आहे. तरी देखील दररोज नवीन घटना घटत आहेत.

Dombivli Crime: अचानक गाडीवर येतात अन्... डोंबिवलीकरांनी रस्त्याने चालण्याचा घेतला धसका! कारण काय?
Dombivli Crime: अचानक गाडीवर येतात अन्... डोंबिवलीकरांनी रस्त्याने चालण्याचा घेतला धसका! कारण काय?
डोंबिवली: कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. डोंबिवलीतील ठाकुर्ली, 90 फुटी रस्ता, एमआयडीसी परिसरात सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. असाच प्रकार आता डोंबिवलीजवळील 27 गाव परिसरात घडत आहे. रस्त्याने चालणाऱ्यांना एकाकी गाठून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने ओरबडून नेण्याचे प्रकार 27 गाव परिसरात घडत आहेत. या घटनांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आजदे गावाच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची 60 हजार रुपये किमतीची साखळी चोरट्यांनी चोरून नेली. त्यानंतर, 90 फुटी रस्ता भागातील चामुंडा सोसायटी परिसरात एका वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावली होती. या प्रकरणांतील चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेली एक आंतरराज्य टोळी देखील कल्याण-डोंबिवली पोलिसांनी जेरबंद केली आहे. तरी देखील दररोज नवीन घटना घटत आहेत.
advertisement
नुकतीच डोंबिवली पूर्वेतील भोपर गाव भागात पुन्हा एक सोनसाखळी चोरीची घटना घडली आहे. एक 43 व्यक्ती शनिवारी (20 सप्टेंबर) आपल्या मुलीसह किराणा दुकानातील सामान आणि भाजीपाला घेऊन पायी घरी चालले होते. त्यावेळी पाठीमागून अचानक एक दुचाकी त्यांच्या अंगावर आली. या प्रकाराने मुलगी आणि वडील दोघेही घाबरले. तेवढ्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एका व्यक्तीने मुलीच्या वडिलांच्या मानेवर जोराचा फटका मारला आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला.
advertisement
वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. काही ग्रामस्थांनी चोरांना धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे. चोरांना पळण्यासाठी गावातून एक ते दोन रस्ते असतात. त्यामुळे गाव हद्दीत या चोरट्यांनी लूट केली तर त्यांना कोंडून पकडून आम्ही घडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं ग्रामस्थ म्हणाले आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dombivli Crime: अचानक गाडीवर येतात अन्... डोंबिवलीकरांनी रस्त्याने चालण्याचा घेतला धसका! कारण काय?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement