कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार? कर्जमाफीचा निर्णय कधी? बावनकुळे-अजित पवार म्हणाले....
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Farmer Loan Waiver: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफीबद्दल सकारात्मक वक्तव्ये केल्याने कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, याबद्दल राज्यातील शेतकऱ्यांची उत्कंठा ताणली गेली आहे.
मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यातील शेतकरी आणि विरोधकांनी कोंडी केल्यानंतर महायुती सरकार सावधपणे पावले टाकायला सुरुवात केली आहे. शेतकरी कर्जमाफीवर सुरुवातीला शब्दही न बोलणारे सत्तापक्षातील नेते किमान कर्जमाफीबद्दल बोलू लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफीबद्दल सकारात्मक वक्तव्ये केल्याने कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, याबद्दल राज्यातील शेतकऱ्यांची उत्कंठा ताणली गेली आहे.
माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर मोठे आंदोलन केले. विरोधकांनी देखील बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. त्या आंदोलनाची दखल सरकारला घ्यायला लागली. तसेच विरोधकांनी देखील हा मुद्दा लावून धरल्याने परिणाम सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली. गुरुवारी माध्यमांनी बावनकुळे आणि अजित पवार यांना शेतकरी कर्जमाफीबद्दल विचारले असचा दोघांनीही सकारात्मक वक्तव्ये केली.
advertisement
आम्ही एक एक घर, एक एक शेतकरी तपासणार
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, माध्यमांनी चं कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची याबद्दल सर्व्हेक्षण सुरू आहे, अहवाल आल्यावर कर्जमाफीच्या नियमांमध्ये कोण कोण बसतंय, कोण लाभार्थी असायला हवे, याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल तसेच सरसकट कर्जमाफी केली तर काय होईल, तर धनदांडग्यांचा फायदा..ज्या गरीब व्यक्तीला कर्जमाफीची गरज आहे, त्यांची कर्जमाफी केली पाहिजे, याकरीता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने समिती तयार केली आहे. एक एक घर, एक एक शेतकरी आम्ही तपासणार आहे. कारण सरसकट कर्जमाफीने धगदांडग्या शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. गरीब माणसांचा लाभ झाला नाही, आर्थिक दुर्बल हे कर्जमाफीतून सुटले, असल्पभूधारकांना लाभ झाला पाहिजे, ज्याला खरी गरज त्यालाच शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे.
advertisement
अजित पवार यांचे चतुर उत्तर
आमच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा होता. आम्हाला निवडून द्या, आम्ही पुढच्या पाच वर्षांत शेतकरी कर्जमाफी करू, असे वचन आम्ही शेतकऱ्यांना दिले होते. वेळ आल्यावर कर्जमाफी करू, सध्या आम्ही लाडकी बहीण योजना आणि इतर विकासकामे करतोय, असे चतुर उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 21, 2025 3:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार? कर्जमाफीचा निर्णय कधी? बावनकुळे-अजित पवार म्हणाले....