Chhagan Bhujbal : दादांना धक्का देणार भुजबळ? मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, बड्या नेत्यांचे फोन टाळले

Last Updated:

Chhagan Bhujbal Ajit Pawar : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सोडून येवलामध्ये गेले आहेत. छगन भुजबळ आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

दादांना धक्का देणार भुजबळ? मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, बड्या नेत्यांचे फोन टाळले
दादांना धक्का देणार भुजबळ? मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, बड्या नेत्यांचे फोन टाळले
नाशिक : महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात काही ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आले. महायुतीने आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना धक्कातंत्राचा वापर केला आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षातील इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सोडून येवलामध्ये गेले आहेत. छगन भुजबळ आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे छगन भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. नागपूरमध्येच भुजबळांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडेही पाठ फिरवली. त्यानंतर सोमवारी सभागृहात हजेरी लावल्यानंतर त्यांनी नाशिकची वाट धरली. ओबीसी समाजावर पकड असणारे छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ओबीसी संघटनाही नाराज आहेत. आता भुजबळांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
advertisement

अजितदादांसह बड्या नेत्यांचे फोन टाळले?

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी कायम असल्याचे दिसून येत आहे. छगन भुजबळ यांना अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, छगन भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोन उचलले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. छगन भुजबळ यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादीकडून काही महत्त्वाचे नेते आज भुजबळ यांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement

भुजबळ आता काय करणार?

छगन भुजबळ यांनी ज्या नागपूरमध्ये पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली, तिथेच त्यांना जवळपास तीन दशकानंतर डावलण्यात आले. आता, या वयात भुजबळांसमोर मोठं राजकीय आव्हान आहे. समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ ओबीसींच्या प्रश्नावर सक्रिय आहेत. आता समता परिषद आणि समर्थक कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून आज आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chhagan Bhujbal : दादांना धक्का देणार भुजबळ? मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, बड्या नेत्यांचे फोन टाळले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement