बायकोला भेटण्यासाठी निघालेल्या पतीचा अपघातात मृत्यू, दुचाकी थेट बसच्या खाली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Paithan Road Accident: पैठण येथे पाहुण्याकडे गेलेल्या पत्नीला भेटण्यासाठी ते नवगाव येथून पैठणला निघाले होते. मात्र वाटेतच त्यांचा अपघात झाला.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या पैठण-शहागड रस्त्यावर आयटीआय कॉलेजजवळ खाजगी बस आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. यात नवगाव येथील दुचाकीस्वार तरुण शत्रुघ्न लक्ष्मण बलैया (वय ४१ वर्ष, रा. नवगाव) ठार झाले.
अपघाताची घटना शनिवारी सायंकाळी घडली. पैठण तालुक्यातील नवगाव येथील मासेमारी व्यवसाय करणारे शत्रुघ्न लक्ष्मण बलैया यांनी दिवसभर मासेमारी केली. काम आटोपल्यानंतर सायंकाळ साडेसहाच्या सुमारास पैठण येथे पाहुण्याकडे गेलेल्या पत्नीला भेटण्यासाठी ते नवगाव येथून पैठणला निघाले होते.
शहागड रस्त्यावरील आयटीआय कॉलेजजवळ समोरून येणाऱ्या खासगी कंपनीच्या बसचा आणि त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. बलैया यांची दुचाकी थेट बसच्या खाली गेली. यात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ त्यांना पैठणच्या शासकीय रुग्णालय दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 05, 2025 1:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बायकोला भेटण्यासाठी निघालेल्या पतीचा अपघातात मृत्यू, दुचाकी थेट बसच्या खाली