Ambadas Danve : 'माझ्या पक्षप्रवेशाच्या बातम्या खोट्या'; अंबादास दानवेंचा भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे भाजपमध्ये प्रवेश करणार या चर्चांना उधाण आले होते. मात्र मी शिवसेना सोडणार नाही असं सांगत त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे भाजपमध्ये प्रवेश करणार या चर्चांना उधाण आले होते. मात्र मी शिवसेना सोडणार नाही, भाजप प्रवेशाच्या बातम्या खोट्या असल्याचं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं. मी उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचं ते म्हणाले आहेत. भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देत अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला.
चंद्रकांत खैरे यांना ठाकरे गटाने तिकिट दिलं आहे. तिकिट दोन - तीन जणांनी मागितलं म्हणजे मतभेद होत नाही. ८ दिवसात संभाजीनगरचा प्रचार करणार आहे. उद्धव ठाकरेंचे हात मजबूत करण्यासाठी मी शिवसेनेतच लढणार आहे. खैरे आणि माझ्यात वाद नाही. नाराज असल्यावर पक्ष सोडतात का? असा प्रश्नही दानवे यांनी विचारला.
लोकसभेसाठी ही भूमिका आहे का? मी सर्व भूमिका मांडल्या आहेत. मी पुन्हा पुन्हा तेच सांगण्यात अर्थ नाही. एका चॅनेलचा फोन आला, एका चॅनेलने चुकीची बातमी लावली. मी मातोश्रीवर असताना चॅनेलकडून फोन आला त्यावर तुम्ही वर्षावर पोहोचले का? भाजप प्रवेश करणार का? असं विचारत होते. हे काय आहे असं म्हणत त्यांनी प्रश्न विचारला.
advertisement
उमेदवारी जाहीर होऊन पाच दिवस झाले. त्याच दिवशी नाराजी, राजी हा विषय संपला. पक्षप्रमुखांकडे मी जाऊन आलो. माझं त्याआधी बोलणं झालं होतं. शिस्त पाळणं गरजेचं असतं. मी शिवसैनिक आहे. शिवसेनेला यश मिळवून देण्यासाठी काम करणार आहे. तिकिट मागणं गुन्हा नाही. मागितलं होतं. दोघांनी तिकिट मागितलं म्हणजे मतभेद आहे म्हणता येणार नाही. तसंच मला महायुतीकडून कोणतीही ऑफर नाही असंही अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं. मी भाजपात होतो आणि ABVP चं काम केलंय. पण मी 30 वर्षांपासून शिवसेनेत आहे असं दानवेंनी सांगितलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 30, 2024 11:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Ambadas Danve : 'माझ्या पक्षप्रवेशाच्या बातम्या खोट्या'; अंबादास दानवेंचा भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम