पुणे स्टेशनचा भार हलका, पण मराठवाड्याचं टेन्शन वाढलं, नांदेड एक्स्प्रेसबाबत मोठा निर्णय
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Nanded Pune Express: मराठवाड्यातून रेल्वेने पुण्याला येणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 26 जानेवारीपासून नांदेड – पुणे एक्स्प्रेस हडपसरपर्यंतच धावणार आहे.
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नांदेड-पुणे एक्स्प्रेस आता हडपसरपर्यंतच चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या निर्णयची अंमलबजावणी 26 जानेवारी 2026 पासून होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आधी हडपसरला जाऊन त्यानंतर पुढचा पुण्याचा प्रवास कराव लागणार आहे.
मराठवाड्यातील मोठा वर्ग नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा उपचाराकरिता दररोज पुण्याकडे ये-जा करत असतो. अशावेळी एसटी आणि ट्रॅव्हल्सपेक्षा अधिक सुरक्षित व परवडणारा पर्याय म्हणून रेल्वेला प्राधान्य दिले जाते. सध्या नांदेड–पुणे एक्स्प्रेस थेट पुणे स्टेशनवर पोहोचते. परंतु नव्या बदलानुसार प्रवाशांना हडपसर येथेच उतरावे लागणार असून पुढील प्रवासासाठी अन्य साधनांचा शोध घ्यावा लागेल.
advertisement
या रेल्वेबाबतचा हा पहिलाच बदल नाही. 2022 मध्ये नांदेड–पुणे द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसला हडपसर सुपरफास्ट म्हणून मर्यादित करण्यात आले होते. त्या वेळी मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी विरोध दर्शविल्यानंतरच रेल्वेला हा निर्णय मागे घ्यावा लागला आणि गाडीचे मार्ग पुन्हा पुणे स्टेशनपर्यंत वाढवण्यात आले. तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा तसाच निर्णय घेण्यात आल्याने नाराजी वाढली आहे.
advertisement
मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “पुणे स्टेशनवर 66 उत्तरेकडील रेल्वे सहज थांबू शकतात, मग मराठवाड्याचीच गाडी का मागे ढकलली जाते? हा स्पष्ट अन्याय असून येथील सर्व खासदारांनी प्रवाशांसाठी पुढे यावे.” तर खासदार डॉ. भागवत कराड यांनीही या विषयावर लक्ष देण्याचे संकेत दिले. “ही रेल्वे पुन्हा पुण्यापर्यंत धावावी यासाठी प्रयत्न सुरू करेन. आवश्यक असेल तर रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांशीही चर्चा करेन,” असे त्यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान, हडपसरपर्यंतच रेल्वे नेल्यास काम करणाऱ्या लोकांना अतिरिक्त खर्च, वेळ आणि अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मेट्रो किंवा बसमध्ये जाण्यासाठी लागणारी गर्दी व विलंबामुळे प्रवास अधिक क्लेशदायक होणार आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 21, 2025 1:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पुणे स्टेशनचा भार हलका, पण मराठवाड्याचं टेन्शन वाढलं, नांदेड एक्स्प्रेसबाबत मोठा निर्णय


