कधी खाल्ला आहे स्पेशल बासुरी डोसा? पाहा काय आहेत वैशिष्ट्ये

Last Updated:

या हॉटेलमध्ये बासुरी डोसा मिळत आहे. हा स्पेशल बासुरी डोसा खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होत असते. 

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर, 31 जुलै : इडली, डोसा, वडा-सांबर हे दक्षिण भारतीय पदार्थ आता अगदी आपले वाटावे इतके महाराष्ट्रात रुळले आहेत. या पदार्थांत आतापर्यंत तुम्ही अनेक वेगवगेळ्या प्रकारचे डोस्याचे प्रकार खाल्ले असतील. पण कधी बासुरी डोसा खाल्ला अन् ऐकला आहे का? नाही ना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री शिवारातील बासुरी हॉटेल या ठिकाणी हा बासुरी डोसा मिळत आहे. हा स्पेशल बासुरी डोसा खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होत असते.
कोणी केली सुरुवात?
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील अतुल मिसाळ यांनी हॉटेल मॅनेजमेंट पदवी पर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. शहरामध्ये विविध डोस्याचे प्रकार भेटतात मग ग्रामीण भागामध्ये ही आपण काही तरी चविष्ट पदार्थ तयार करावा असा विचार त्यांनी केला. ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग खवय्ये हे डोस्यालाच पसंती देतात. त्यामुळे इथेच काही स्पेशल डोसा तयार करून असा विचार त्यांनी केला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्री शिवारात बासुरी हॉटेल येथे स्पेशल बासुरी डोसा सुरुवात केली.
advertisement
डोस्याचे काय वैशिष्ट्ये?
या डोस्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा डोसा जास्त कॉन्टिटी असतो.  यामध्ये हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीट, कोथिंबीर, काकडी, टोमॅटो, सिमला मिरची यांचाही वापर केला जातो. ‌तसेच ओल खोबर, दाळ,फोडणी देऊन तयार केलेली चटणी, बटाट, कांदा हिरव्या मिरच्या चिरलेल्या, तेल लसूण, आल्याची पेस्ट, मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता, उडीद डाळ, चवीनुसार मीठ तसेच चीझ, बॅटर, पनीर,हे सर्व टाकून पुन्हा त्या डोस्याला फोल्ड करून पुन्हा या डोस्यावरती चीज आणि बटर लावले जाते.
advertisement
काय आहे किंमत?
बासुरी स्पेशल डोस्याला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पसंती असते. या स्पेशल बासुरी डोस्याची किंमत 150 रुपये ठेवण्यात आलेली आहे. धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणारे प्रवाशी हामखास या ठिकाणी थांबून बासुरी स्पेशल डोसा खाल्ल्याशिवाय जात नाही. तसं शहरापेक्षा स्वादिष्ट डोसा ग्रामीण भागात भेटत असल्याने या डोस्याची मागणी जास्त प्रमाणात आहे, असं अतुल मिसाळ यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
कधी खाल्ला आहे स्पेशल बासुरी डोसा? पाहा काय आहेत वैशिष्ट्ये
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement