गुगल मॅपने UPSCच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ, परीक्षा केंद्रापासून 15 किमी दूर पोहोचले, 50 जण पेपरला मुकले

Last Updated:

गुगल मॅपच्या चुकीमुळे त्यांना त्यांचे कॉलेज दुसऱ्याच ठिकाणी दाखवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या केंद्रावर पोहोचण्यासाठी एक-दोन मिनिटांचा उशीर झाला

News18
News18
अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर : देशभरात आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पार पडत आहेत. संभाजीनगरमध्ये देखील मराठवाड्यातून अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी दाखल झालेत, मात्र गुगल मॅपच्या चुकीमुळे त्यांना त्यांचे कॉलेज दुसऱ्याच ठिकाणी दाखवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या केंद्रावर पोहोचण्यासाठी एक-दोन मिनिटांचा उशीर झाला, त्यामुळे त्यांना परीक्षेसाठी केंद्रात घेण्यात आले नाही. शहरात जवळपास 50 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले. यावेळी अनेक विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले.
युपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. मात्र गुगल मॅपच्या आधारे परीक्षेचं सेंटर शोधणाऱ्या अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना परीक्षेला मुकावं लागलंय. विवेकानंद कॉलेजचा पत्ता प्रत्यक्ष ठिकाणापासून गुगल मॅपवर १५ किमी दूर अंतरावर दाखवला जात असल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळेत पोहोचता आलं नाही.
जालन्यावरून आलेल्या विद्यार्थ्याने परीक्षेला येताना कसा गोंधळ झाला याची माहिती दिली. जालन्यावरून निघताना परीक्षा केंद्राचा पत्ता गुगलवर शोधला. विवेकानंद आर्ट्स, सरदार दलीप सिंग कॉमर्स एंड साइंस कॉलेज, समर्थनगर संभाजीनगर असा पत्ता होता. गुगलला टाकल्यानंतर इथून २० किमी लांब वडगाव एमआयडीसीतलं लोकेशन दाखवलं. तिथं पावणे नऊला पोहोचल्यावर पत्ता चुकल्याचं कळलं. तिथून पुन्हा कॉलेजवर आलो, मला दोन मिनिटं वेळ झाल्यानं प्रवेश नाकारला.
advertisement
परीक्षेसाठी जे सेंटर देण्यात आलंय ते कॉलेज गुगल मॅपवर दाखवत नाही. आताही लोकेशन फेच करत नाहीय असं विद्यार्थ्याने म्हटलं. मुलं अभ्यास करून केवळं गुगल मॅप किंवा प्रशासनाच्या छोट्या मोठ्या चुकांमुळे परीक्षेपासून वंचित राहिले. बाहेर गावाहून येणाऱ्यांना शहर माहिती नसतं. गुगल दाखवतं तसं जातात तेव्हा त्या ठिकाणी गेल्यानंतर ते सेंटर नसल्याचं लक्षात येतं. जवळपास ५० विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावं लागल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
गुगल मॅपने UPSCच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ, परीक्षा केंद्रापासून 15 किमी दूर पोहोचले, 50 जण पेपरला मुकले
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement