संशयित आरोपी सोबत आली, पोलीस ठाण्यात महिला पोलिसाला मारहाण, सोन्याची चेन हिसकावली

Last Updated:

बिडकीन पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचारी समीना अहमद शेख या ड्युटीवर असताना संशयित आरोपी रजिया शेख हिने त्यांना मारहाण केली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण
छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण
छत्रपती संभाजीनगर: पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या संशयित आरोपीसोबत आलेल्या एका महिलेने पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यालाच मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन पोलीस ठाण्यामध्ये घडली आहे. त्यावरून रजिया रियाज शेख हिच्यावर बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.
बिडकीन पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचारी समीना अहमद शेख या ड्युटीवर असताना संशयित आरोपी रजिया शेख ही ठाण्यातील पीएसओ रूममध्ये आली. तू मला काय बोललीस? असे म्हणत तिने पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या समीना अहमद शेख यांना अरेरावी करत शिवीगाळ केली.
यानंतर तिने कपडे ओढून गालात चापट मारली आणि गळ्यातील दोन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून घेतली. इतक्यावरच न थांबता, तिने महिला पोलिसाला ठार मारण्याची धमकीही दिली. त्यावेळी पोलीस ठाण्यात होत असलेल्या मारहाणीचा एका खासगी व्यक्तीने मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ काढला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संशयित आरोपी सोबत आली, पोलीस ठाण्यात महिला पोलिसाला मारहाण, सोन्याची चेन हिसकावली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement