धनगर समाजातल्या मुलांसाठी सरकारकडून २ विशेष योजना, CM फडणवीसांकडून जाहीर

Last Updated:

Maharashtra Cabinet Decision: धनगर समाजातल्या मुलांसाठी राज्य सरकारकडून दोन विशेष योजना जाहीर करण्यात आल्या.

देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
चौंडी (अहिल्यानगर) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात श्री क्षेत्र चौंडी, अहिल्यानगर येथे ऐतिहासिक राज्य मंत्रिपरिषद बैठक संपन्न झाली. या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या त्रिशताब्दीनिमित्त १० मोठे निर्णय घेण्यात आले. धनगर समाजातल्या मुलांसाठी सरकारकडून विशेष योजना जाहीर करण्यात आल्या.
धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ‘यशवंत विद्यार्थी योजना’ म्हणून ही योजना राबविण्याचे सरकारने ठरविले आहे.
धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतिगृह बांधण्याच्या योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना’ असे नाव देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे.
advertisement
अहिल्यानगर जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करणार तसेच अहिल्यानगर येथे मुली आणि महिलांसाठी नवीन आयटीआय सुरु करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
दुसरीकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करणार. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम करणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.
advertisement

सरकारने काय काय निर्णय घेतले?
1) धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव.
‘यशवंत विद्यार्थी योजना’ म्हणून ही योजना आता राबविणार
- दरवर्षी 10,000 विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिक्षण
- आतापर्यंत यासाठी 288.92 कोटी रुपये वितरित
- राजे यशवंतराव होळकर यांनी 1797 ते 1811 या काळात शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक कामे केली. गुरुकुलसारख्या पारंपारिक शिक्षणाला चालना दिली. लष्करी शिक्षणात शिस्त, नीती आणि नेतृत्त्वगुणांचा समावेश केला. शिक्षण सर्वांसाठी खुले केले. राजवाड्यात मुलींसाठी शिक्षणाच्या सुविधा उभारल्या. आता त्यांच्या नावे ही योजना
advertisement
2) धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणार्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतीगृह बांधण्याच्या योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना’ असे नाव
- राज्यातील महसूल विभागाच्या मुख्यालयी धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह
- प्रत्येकी 200 क्षमतेची ही वसतीगृह असणार. यात मुलांसाठी 100 क्षमतेचे तर, मुलींसाठी 100 क्षमतेचे.
- नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे वसतीगृह
advertisement
- नाशिक येथे काम सुरु, पुणे, नागपूर येथे लवकरच सुरु होणार
- या वसतीगृहांना आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असे नाव
3)अहिल्यानगर जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करणार
-या महाविद्यालयाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव असेल.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धनगर समाजातल्या मुलांसाठी सरकारकडून २ विशेष योजना, CM फडणवीसांकडून जाहीर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement