CM फडणवीस-राज यांच्यातील तासाभराच्या बैठकीत काय घडलं? समोर आली मोठी अपडेट....

Last Updated:

CM Devendra Fadnavis Raj Thackeray Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज वांद्रे येथील हॉटेल ताज लँड्स एन्डमध्ये भेट झाली आहे. या बैठकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

CM फडणवीस-राज यांच्यातील बैठक संपली, तासाभराच्या बैठकीत काय घडलं? समोर आली मोठी बातमी....
CM फडणवीस-राज यांच्यातील बैठक संपली, तासाभराच्या बैठकीत काय घडलं? समोर आली मोठी बातमी....
तुषार रुपनवार, प्रतिनिधी, मुंबई: मागील काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे आज मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज वांद्रे येथील हॉटेल ताज अॅण्ड लँड्समध्ये भेट झाली आहे. या बैठकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
गुरुवारी सकाळी राज ठाकरे मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये पोहोचले. त्याच दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा पोहचला. त्यामुळे आज दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चांवर काही वेळेत शिक्कामोर्तब झाले. एका बाजूला शिवसेना ठाकरे गटाकडून युतीसाठी सकारात्मक भूमिका घेतली जात असताना दुसरीकडे आज राज यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
advertisement

बैठकीत कोण होतं सहभागी?

हॉटेल ताज अॅण्ड लँड्स मध्ये भाजप आणि मनसेत चर्चा सुरू आहे. ही चर्चा एकूणच आगामी मुंबई महापालिका आणि इतर निवडणुकीबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. आजच्या या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे दोघेच बैठकीत आहेत. या बैठकीत इतर कोणत्याही नेत्याचा समावेश नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे
advertisement

बंद दारआडच्या बैठकीत काय झालं?

तब्बल तासानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हॅाटेल मधून बाहेर पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात जवळपास तासभर बैठक चालली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
CM फडणवीस-राज यांच्यातील तासाभराच्या बैठकीत काय घडलं? समोर आली मोठी अपडेट....
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement