Devendra Fandavis Raj Thackeray : देवेंद्र आणि राजसोबत बैठकीत कोण? हॉटेल ताज लँड्स एन्ड्समध्ये मोठी घडामोड
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Devendra Fandavis Raj Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज वांद्रे येथील हॉटेल ताज अॅण्ड लँड्समध्ये भेट झाली आहे. या बैठकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
तुषार रुपनवार, प्रतिनिधी, मुंबई: मागील काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे आज मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज वांद्रे येथील हॉटेल ताज लँड्स एन्डमध्ये भेट झाली आहे. या बैठकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
गुरुवारी सकाळी राज ठाकरे मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये पोहोचले. त्याच दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा पोहचला. त्यामुळे आज दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चांवर काही वेळेत शिक्कामोर्तब झाले. जवळपास तासभरापासून या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. एका बाजूल मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा सुरू असताना, राज ठाकरे आणि फडणवीस एकत्र आल्याने राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे.
advertisement
बैठकीत कोण?
हॉटेल ताज अॅण्ड लँड्स मध्ये भाजप आणि मनसेत चर्चा सुरू आहे. ही चर्चा एकूणच आगामी मुंबई महापालिका आणि इतर निवडणुकीबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. आजच्या या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे दोघेच बैठकीत आहेत. या बैठकीत इतर कोणत्याही नेत्याचा समावेश नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
चर्चा ठाकरे गटासोबतच्या युतीची...
ठाकरे बंधू बीएमसी निवडणुकीआधी एकत्र येणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. दोघांनी तसं सूचक संकेत दिल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत पडद्यामागे हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते युतीबाबत सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात परदेशात भेट झाली होती. ठाकरे बंधूंमध्ये ही गुप्त भेट माध्यमांना चकवा देत परदेशात झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. याआधी दोन्ही ठाकरे बंधू कौटुंबिक कार्यक्रमातही एकत्र दिसले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 12, 2025 11:28 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fandavis Raj Thackeray : देवेंद्र आणि राजसोबत बैठकीत कोण? हॉटेल ताज लँड्स एन्ड्समध्ये मोठी घडामोड