दाऊदी बोहरा समाजाचा 15 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी मोठा निर्णय;मनमाड, मालेगावात अंमलबजावणी सुरु
- Published by:Prachi Amale
Last Updated:
दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरुंनी 15 वर्षांखालील मुलांना मोबाईल देण्यास बंदी केली अन् हा आमूलाग्र बदल दिसून येत आहे.
बब्बू शेख, प्रतिनिधी
मनमाड : राज्यातील दाऊदी बोहरा समाजानं 15 वर्षांपर्यंतच्या मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी घातली आहे. बोहरा समाजाचा हा निर्णय क्रांतिकारी ठरला असून अनेक भागात त्याचं अनुकरण करण्यात येतंय.मनमाडमध्येही मुलांच्या हातातील मोबाईल गायब झालाय...
कॅरम खेळणारी...सापशिडीचा डाव मांडून बसलेली....बैठे खेळ खेळणारी मुलं......अलिकडच्या काळातील अतिशय दुर्मिळ झालेलं हे चित्र मनमाड, मालेगाव परिसरात दिसून येतंय .दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरुंनी 15 वर्षांखालील मुलांना मोबाईल देण्यास बंदी केली अन् हा आमूलाग्र बदल दिसून येत आहे.
advertisement
दाऊदी बोहरा समाजाचा मोठा निर्णय
मोबाईलचा अतिवापर ही सध्याची सर्वात मोठी समस्या बनली आहे. मोठ्यांप्रमाणेच लहानग्यांच्याही हाती मोबाईल सर्रास दिसतोय. कोणी गेम खेळतंय तर कोणी रिल्स पाहतंय.जेवताना, झोपताना, प्रवास करताना मुलांना हातात मोबाईल हवा असतो.मोबाईलच्या या अतिवापराचे तोटेही दिसून येतायत आणि म्हणूनच दाऊदी बोहरा समाजानं हा मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयाचं बालरोगतज्ज्ञांनी स्वागत केलंय.
advertisement
भारत सरकारनंही कडक कायदा करण्याची गरज
कोरोना काळापासून मोबाईल स्क्रिनच्या विळख्यात अडकलेलया लहानग्यांना बाहेर काढण्यासाठी चीनमध्ये मुलांना शाळेत मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे..स्पेनमध्ये मुलांच्या स्मार्ट फोन वापरण्यावर नियंत्रण तर आयर्लंड, फ्रान्स, कॅनडामध्ये 3 वर्षांखालील मुलांना मोबाईल बंदी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियामध्येही 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात आलीय. भावी पिढीला मोबाईलच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी केवळ एखाद्या दुसऱ्या समाजानं नव्हे तर भारत सरकारनंही कडक कायदा करण्याची गरज व्यक्त करण्यात येतेय...
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 09, 2025 8:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दाऊदी बोहरा समाजाचा 15 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी मोठा निर्णय;मनमाड, मालेगावात अंमलबजावणी सुरु


